गोंदिया : केंद्र शासनाने पारित केलेले शेतकरी विरोधी तिन्ही विधेयक मागे घेण्यात यावीत यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी (दि. २७) वंचित बहुजन आघाडीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश बन्सोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास समर्थन देत केंद्र शासनाने पारित केलेले शेतकरी विरोधी तिन्ही विधेयक मागे घेण्यात यावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव देण्यात यावा, एम.एस.पी. नियमित धरून शेतकऱ्यांना २५०० रुपये देण्यात यावे, बनावट बी-बियाणे व खत विकणाऱ्यांविरोधात योग्य कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनात ए.डी .महाजन, विनोद मेश्राम, सिध्दार्थ हुमने, राजू राहुलकर, विनोद नांदुरकर, यशवंत तागडे, अशोक खोब्रागडे, सुरेंद्र खोब्रागडे, प्यारेलाल जांभूळकर, ॲड. बोंबार्डे, ॲड. गडपायले, ॲड. बोरकर, आकाश साखरे, राज दहाटे, शालीकराम परतेती, डॉ. मुंगमोळे, हेमंत बडोले, किरण फुले व अन्य उपस्थित होते.