शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे अश्रू पुसणे हेच ध्येय

By admin | Updated: February 22, 2016 01:57 IST

९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली.

रवी राणा : युवा जागृती संमेलनाची सांगतागोंदिया : ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली. आजघडीला गावापासून मोठ्या शहरापर्यंत युवा स्वाभिमानरूपी रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. गरीब, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी ही संघटना तत्पर असून गरिबांचे अश्रू पुसणे हे युवा स्वाभिमानचे ध्येयधोरण आहे, असे प्रतिपादन युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आ. रवी राणा यांनी केले.युवा स्वाभिमानच्या वतीने गणेशनगर येथील शारदा कॉन्व्हेंटच्या प्रांगणात युवा जागृती संमेलन घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून बडनेरा क्षेत्राचे आ. रवी राणा उपस्थित होते. उपस्थित संघटनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले, युवा स्वाभिमान ही केवळ संघटनाच नव्हे, तर विचारांची चळवळ आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य गरीब जनतेसाठी लढावे. प्रसंगी त्यांच्या समस्यांसाठी रस्त्यावरदेखील उतरण्याची तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.याप्रसंगी मंचावर युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त अनिल देशमुख, नागपूरचे जिल्हाध्यक्ष शेखर बिसेन, वाय.पी. येडे, संचालक भूवन बिसेन, पोलीस पाटील हेतराम रहांगडाले, शैलेश मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकातून जितेश राणे यांनी युवा स्वाभिमानच्या बळकटीकरणाची पार्श्वभूमी मांडून भूमिका स्पष्ट केली.पुढे राणा म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडताना अटक झाली तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांसाठी संपूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारावे. कार्यकर्त्यांची नुसती गर्दी नको तर दर्दी कार्यकर्ते असावेत ज्यांना समाजातील समस्यांची जाण आहे. महागडी शस्त्रक्रिया, अपूर्ण शिक्षण अशा समस्या असल्यास नागरिकांनी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांचे नि:शुल्क उपचार करून देण्यात येईल. पैशासाठी शिक्षण सोडणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. अदानीसारख्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. परप्रांतीयांना हाकलून लावून स्थानिकांना रोजगार देण्यासाठी युवा स्वाभिमान पुढाकार घेईल. महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्प रखडला आहे. त्याला सुरू करून स्थानिकांना रोजगार देण्यात यावे, अशी मागणी आपण स्वत: मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गरिबांसाठी लवकरच मोफत रूग्णाहिका पुरविण्याची घोषणा त्यांनी केली. वेगळा विदर्भ करण्याचे भाजपने वचन दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वेगळा विदर्भ न केल्यास भाजपला मतदार जागा दाखवतील, असा टोलाही राणा यांनी लगावला. तसेच पुढच्या दौऱ्यात गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक मागासलेल्या गावात एक रात्र मुक्काम करून समस्यांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील वाघमारे यांनी केले. आभार धनजित बैस यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)