शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय शेती शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:24 IST

शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशके व औषधांचा वापर करीत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी होत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे.

ठळक मुद्देएस.आर. पुस्तोडे : नांदलपार येथे सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशके व औषधांचा वापर करीत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी होत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे.या बाबीवर मात करण्यासाठी तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सेंद्रीय शेती शेतकºयांसाठी वरदान असल्याचे प्रतिपादन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.आर.पुस्तोडे यांनी केले. तालुक्यातील ग्राम नांदलपार येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्तवतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत आयोजीत सेंद्रीय शेती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश आर. सोनेवाने उपस्थित होते. पुढे बोलताना पुस्तोडे यांनी, रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जमिनीचे आरोग्य खालावले, पाणी दूषीत झाले तर वातावरणात त्याचे विपरीत परिणाम होत आहे. उत्पादीत शेतमाल विषयुक्त झाल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.यावर रामबाण उपाय सेंद्रीय शेती हे असल्याचे सांगून त्यांनी सेंद्रीय शेतीचे महत्व, फायदे, सेंद्रीय अन्नधान्याची मागणी रासायनिक खते, औषधी यापासून होणारे दुष्परिणाम सांगीतले. तसेच शासनामार्फत दिले जाणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. तर सोनेवाने यांनी, शेतकऱ्यांनी उपलब्ध संसाधनांचा वापर करुन कोणतीही निविष्ठा बाजारपेठातून न घेता सेद्रीय निविष्ठा कशी तयार करता येईल हे सांगीतले. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दर्शपर्णी अर्क व जीवामृत कसे तयार करायचे हे शेतकऱ्यांना दाखवून दिले.शेतकरी गटाची स्थापनाप्रशिक्षणात नांदलपर येथील साईबाबा सेंद्रीय शेतकरी गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) सन २०१८-१९ अंतर्गत ५० शेतकऱ्यांचे गट स्थापन करुन त्या शेतकऱ्यांना आत्मा व कृषी विभाग मार्फत सेंद्रीय शेती संबंधी प्रशिक्षण देण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती