शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे आरक्षण काढावे लागणार नव्याने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:28 IST

गोंदिया : जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्य न्यायालयाने गुरुवारी ...

गोंदिया : जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्य न्यायालयाने गुरुवारी सुनावणी करीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एकूण आरक्षण हे ५० टक्केपेक्षा अधिक नको असा निर्णय दिला. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता असून ५० टक्के आरक्षणात सर्व जागा बसवून त्यानुसार पुन्हा या जागांसाठी आरक्षण जाहीर करावे लागणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक आधीच आठ महिने लांबणीवर गेली होती. त्यातच महिनाभरापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जि.प.निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. १० मार्चला अंतिम मतदार यादी सुध्दा जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र आता सर्वोच्य न्यायालयाने जिल्हा परिषद आरक्षणाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्णयानुसार ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण नको असा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे आता नव्याने आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.

गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय असून त्यानुसार २३ जागा जनरल, एससीसाठी ६, एसटीकरिता १० आणि ओबीसीसाठी १४ जागा राखीव होत्या. मात्र हे एकूण ५० टक्के आरक्षणपेक्षा अधिक असून ५६.६० आरक्षण होत आहे. त्यामुळे हे ६.६० टक्के आरक्षण कमी करण्यासाठी ३ जागांचे आरक्षण कमी करावे लागेल. तर पंचायत समितीच्या एकूण १०६ जागा असून जनरल ४५, एससी करिता १२, एसटी करिता १९ आणि ओबीसीसाठी ३० जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र येथे सुध्दा ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण होत आहे. ७.५४ टक्के आरक्षण अधिक असल्याने ८ जागांचे आरक्षण कमी करावे लागणार आहे. त्यामुळे प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. त्यानंतच पुढील प्रक्रिया पार पाडता येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

........

अंतिम मतदार याद्या जाहीर होणार का?

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १० मार्चला अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहे. मात्र आता सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मतदार याद्यांच्या कार्यक्रमावर परिणाम तर होणार नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.

......

निवडणुकीला घेऊन चर्चेला उधाण

जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधीच लांबल्या आहेत. त्यातच आता आरक्षणाची पुन्हा फेररचना करावी लागणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होणार की नाही याबाबत शंका आहे. तर याच विषयाला घेऊन गावागावात सध्या चर्चेला उधाण आले आहे.