शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे आरक्षण काढावे लागणार नव्याने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :   जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद निवडणुकीबाबत पुन्हा अनिश्चितता : शासनाच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्य न्यायालयाने गुरुवारी सुनावणी करीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एकूण आरक्षण हे ५० टक्केपेक्षा अधिक नको असा निर्णय दिला. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता असून ५० टक्के आरक्षणात सर्व जागा बसवून त्यानुसार पुन्हा या जागांसाठी आरक्षण जाहीर करावे लागणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक आधीच आठ महिने लांबणीवर गेली होती. त्यातच महिनाभरापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जि.प.निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. १० मार्चला अंतिम मतदार यादी सुध्दा जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र आता सर्वोच्य न्यायालयाने जिल्हा परिषद आरक्षणाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्णयानुसार ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण नको असा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे आता नव्याने आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय असून त्यानुसार २३ जागा जनरल, एससीसाठी ६, एसटीकरिता १० आणि ओबीसीसाठी १४ जागा राखीव होत्या. मात्र हे एकूण ५० टक्के आरक्षणपेक्षा अधिक असून ५६.६० आरक्षण होत आहे. त्यामुळे हे ६.६० टक्के आरक्षण कमी करण्यासाठी ३ जागांचे आरक्षण कमी करावे लागेल. तर पंचायत समितीच्या एकूण १०६ जागा असून जनरल ४५, एससी करिता १२, एसटी करिता १९ आणि ओबीसीसाठी ३० जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र येथे सुध्दा ५० टक्के पेक्षा अधिक आरक्षण होत आहे. ७.५४ टक्के आरक्षण अधिक असल्याने ८ जागांचे आरक्षण कमी करावे लागणार आहे. त्यामुळे प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. त्यानंतच पुढील प्रक्रिया पार पाडता येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अंतिम मतदार याद्या जाहीर होणार का? राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १० मार्चला अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहे. मात्र आता सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मतदार याद्यांच्या कार्यक्रमावर परिणाम तर होणार नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. निवडणुकीला घेऊन चर्चेला उधाणजिल्हा परिषदेच्या निवडणुका आधीच लांबल्या आहेत. त्यातच आता आरक्षणाची पुन्हा फेररचना करावी लागणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होणार की नाही याबाबत शंका आहे. तर याच विषयाला घेऊन गावागावात सध्या चर्चेला उधाण आले आहे. 

जिल्हा परिषद आरक्षण संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या कार्यक्रमावर काही प्रमाणात परिणाम होवू शकतो. आता शासन यावर काय मार्ग काढते यावर पुढील प्रक्रिया अवलंबून आहे.                            - गंगाधर परशुरामकर, माजी जि.प.सदस्य. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदreservationआरक्षण