शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी मिळणार का मग्रारोहयोचा थकीत निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली. मात्र या कामांची १७ कोटी ६९ लाख ११ हजार रुपयांची देयके मागील ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यात पांदण रस्त्यांच्या कुशल कामाची देयके न मिळाल्याने ४०० हून अधिक ग्रामपंचायत आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. तर काम करणारे कंत्राटदार सुद्धा अडचणीत आले आहे.

ठळक मुद्दे२४ कॉलमची माहिती जि.प.ला सादर : मुकाअ यांनी पाठविले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ४०० हून अधिक ग्रामपंचायतींचे मग्रारोहयोच्या कामाचे १७ कोटी ६९ लाख रुपये थकीत आहे. यासंदर्भात अनेकदा शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र जिल्हा परिषद लेखा विभागाच्या वेळकाढू धोरणाचा फटका याला बसत आहे. आता पंचायत विभागाने यातील त्रुट्या दूर करुन हा प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे आतातरी थकीत निधी मिळतो काय याकडे ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली. मात्र या कामांची १७ कोटी ६९ लाख ११ हजार रुपयांची देयके मागील ३ वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यात पांदण रस्त्यांच्या कुशल कामाची देयके न मिळाल्याने ४०० हून अधिक ग्रामपंचायत आर्थिक कोंडीत सापडल्या आहेत. तर काम करणारे कंत्राटदार सुद्धा अडचणीत आले आहे. परिणामी या ग्रामपंचायत अंतर्गत दुसरे काम करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्या कामांचे २४ कॉलम असलेल्या माहितीचा अहवाल, ना हरकत प्रमाणपत्र व यासाठी गठीत करण्यात आलेल्या समित्यांच्या शिफारस जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला. यावर थकून असलेले १७ कोटी ६९ लाख ११ हजार रूपये काढण्यात यावे असे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी (दि.२०) जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.मनरेगातंर्गत गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पांदन रस्ते, माती वाहतूक, वृक्ष लागवडसह इतर कुशल कामे सन २०१६ ते २०१९ या कालावधीत करण्यात आली. या कामांमुळे हजारो मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध झाली. शिवाय शासनाकडून सुद्धा या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. जिल्ह्यातील कुशल कामाचे पैसे देण्यात यावे यासाठी पालकमंत्री अनिल देशमुख, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सतत पाठपुरावा करून त्यावर तोडगा काढण्याचा विचार केला. यावर शासनाने २४ कॉलमची माहिती मागीतली होती. ती माहिती आता जिल्ह्यातील ८ ही तालुक्यांतून जिल्हा परिषदेला सादर करण्यात आली आहे.तालुकास्तरावर गठित केली समितीराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित कुशल निधी देण्यासाठी पंचायत समितीस्तरावर तालुकास्तरीय गठित करण्यात आली होती. गटविकास अधिकाºयांच्या अध्यक्षतेत व लेखाधिकाºयांचा समितीत समावेश होता. त्यांनी संपूर्ण चौकशी करून २४ कॉलम असलेली माहिती जिल्हा परिषदेला पाठविली आहे.सरपंचांचा उपोषणाचा इशारामागील ३ वर्षांपासून ग्रामपंचायतचे मग्रारोहयोच्या कामांचे १७ कोटी ६९ लाख रुपये थकले आहेत. यामुळे ग्रामपंचायतींची आर्थिक कोंडी झाली आहे. यात जिल्हा परिषद लेखाधिकारी वांरवार त्रुट्या काढून विलंब करीत आहे. त्यामुळे सरपंच हैराण झाले असून आता हा निधी न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच व जिल्हा परिषद सदस्य परशुरामकर यांनी दिला आहे.