शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाप्रमाणेच रब्बीला बोनस मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:38 IST

राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. सध्या रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत विक्रीस आला असून खरीपाप्रमाणेच रब्बीतील धानाला बोनस मिळणार का, असा संभ्रम शेतकºयांमध्ये निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात : केंद्रावर धानाची आवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. सध्या रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत विक्रीस आला असून खरीपाप्रमाणेच रब्बीतील धानाला बोनस मिळणार का, असा संभ्रम शेतकºयांमध्ये निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी धानाची सुध्दा जवळपास ३६ हजार हेक्टरवर लागवड केली जाते. सध्या रब्बीतील धानाची मळणी करुन तो विक्रीसाठी बाजारपेठेत येत आहे. बहुतेक शेतकरी हे शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करतात.यंदा सरकारने निवडणुकीच्या तोंडावर खरीपात धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल बोनस जाहीर केला होता. मात्र हेच धोरण रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू राहील. यासंदर्भातील कुठलेच स्पष्ट आदेश नाही. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुध्दा यावर अद्याप मौन बाळगले आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणारे शेतकरी बोनस मिळणार की नाही या संभ्रमात आहेत. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने व पुढे विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने शासन रब्बी हंगामातही धानपिकाला खरीप हंगामात जाहिर केलेला बोनस कायम ठेवील अशी आशा आहे.खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर तर रब्बी हंगामात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या समर्थन मुल्यानुसार धानपिकाला १७५० व १७७० अशा हमीभाव दिला. ५०० रुपये प्रती क्विंटल पकडल्यास २३५० प्रती क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळतो. लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात धानपिकाला सरसकट २५०० रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात येत आहे. अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.प्रत्येक हंगामासाठी हमीभाव व बोनसचे स्वरुप वेगळे असते. खरीप हंगामात दरवर्षी शासनाच्यावतीने बोनस जाहीर करण्यात येते. मात्र, ते बोनस रब्बी हंगामातील धानपिकाला मिळत नाही. रब्बीतील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या काही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर धानाची आवक सुरू झाली असून बोनसचा तिढा मात्र कायम आहे.

टॅग्स :agricultureशेती