शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव हल्ले वाढले, आता गावातही होत आहे शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

शिवराम काशीराम लोधी (वय ६५) यांचा मोरगाव शिवारात गट क्रमांक-३५८ मध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्मच्या देखरेखीसाठी त्यांनी लेब्रो जातीचा कुत्रा पाळला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास या पोल्ट्रीफार्मवरील गडी जेवणाकरिता घरी गेले.  ८.३० वाजता जेव्हा ते पोल्ट्रीफार्मवर परत आले तेव्हा त्यांना कुत्रा मेलेल्या अवस्थेत आढळला. या कुत्र्याचे पोट पूर्णतः फाडलेल्या स्थितीत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळेच बिबटयांचे मानव व पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याच्या अनेक घटना तालुक्यात बघावयास मिळत आहेत. बिबट्यांचा सावजासाठी आता चक्क गावात शिरकाव होताना दिसत आहे. यात प्राणहानी होत नसली तरी वन्यजीव व मानव संघर्ष पेटला आहे. यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण आहे.यापूर्वी बरडटोली, दाभना, खांबी व घुसोबाटोला येथे गावात शिरून कोंबडी व बकऱ्यावर बिबट्याने ताव मारल्याच्या घटना घडल्या आहेत. अलीकडेच चान्ना-बाकटी येथे शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याचीसुद्धा घटना घडली आहे. बोंडगावदेवी गावानजीक मिलजवळ दोन बिबट दिसून आले. आता पोल्ट्रीफार्ममध्ये बांधलेल्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याची घटना मोरगाव येथे २ दिवसांपूर्वी घडली. शिवराम काशीराम लोधी (वय ६५) यांचा मोरगाव शिवारात गट क्रमांक-३५८ मध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. या पोल्ट्री फार्मच्या देखरेखीसाठी त्यांनी लेब्रो जातीचा कुत्रा पाळला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास या पोल्ट्रीफार्मवरील गडी जेवणाकरिता घरी गेले.  ८.३० वाजता जेव्हा ते पोल्ट्रीफार्मवर परत आले तेव्हा त्यांना कुत्रा मेलेल्या अवस्थेत आढळला. या कुत्र्याचे पोट पूर्णतः फाडलेल्या स्थितीत होते. लगेच त्यांनी पोल्ट्रीफार्ममधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता ते बघून चकितच झाले. कुत्र्याला ७ वाजतादरम्यान बिबट्याने ठार केल्याचा व्हिडिओ समोर आले. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. हा परिसर रामघाट जंगलाला लागून आहे. या जंगलात बिबट्यांची संख्या वाढत आहे. जंगल परिसराला लागून शेती असून लगतच लोधी यांचे पोल्ट्रीफार्म आहे. या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याने गुराख्यांना अनेकदा दिवसाढवळ्या दर्शन दिले आहे. तोंडाला रक्ताची चव लागलेले हिंस्र पशुखाद्य मिळाले नाही तर गावाकडे धाव घेतात. गोठ्यात बांधलेल्या पाळीव पशूंना लक्ष्य बनवितात. अशा घटनांतही लक्षणीय वाढ झाली आहे. मानवावरील हल्लेसुद्धा वाढत असल्याने भीतीदायक वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने या हिंस्र पशूंचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्या