शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावर लावले रुंदी कठडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:30 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरक्षीत नसल्याचा अहवाल रेल्वे विभागाने दिला. तसेच पुलावर उंची व रुंदी कठडे लावण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र तीन महिन्याचा कालावधी लोटून पुलावरुन रुंदी कठडे लावण्यात आले नव्हते. परिणामी पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरुन रुंदी कठडे लावून केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकेवळ दुचाकी वाहनांना प्रवेश : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल,

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरक्षीत नसल्याचा अहवाल रेल्वे विभागाने दिला. तसेच पुलावर उंची व रुंदी कठडे लावण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र तीन महिन्याचा कालावधी लोटून पुलावरुन रुंदी कठडे लावण्यात आले नव्हते. परिणामी पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरुन रुंदी कठडे लावून केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना या पुलावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.जुना उड्डाणपुलाच्या बांधकामाला बरीच वर्षे झाली आहे. त्यामुळे हा पूल जीर्ण झाला असून पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे या पुलावरुन जड इतर वाहनांची वाहतूक सुरू ठेवल्यास पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता रेल्वे विभागाने वर्तविली होती. यासंबंधीचे पत्र सुध्दा जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याची दखल घेत या पुलावर उंची कठडे लावून व जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.उंची कठडे लावतानाच रुंदी कठडे सुध्दा लावण्याचे निर्देश होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी मागील तीन महिन्यापासून या पुलावरुन जड वाहने वगळता इतर सर्वच वाहने धावत होती. त्यामुळे अपघात आणि पुलाचा भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देत त्वरीत उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही पुलावर रुंदी कठडे लावून दुचाकी व तीन चाकी वाहने वगळता इतर वाहनाना प्रवेश बंदी का केली नाही असा खुलासा मागतिल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरीत दखल घेत पुलाच्या दोन्ही बाजुला रुंदी कठडे लावले. तसेच दुचाकी आणि तीन चाकी वाहने वगळता सर्वच वाहनांना जुन्या उड्डाणपुलावर प्रवेश बंदी लागू केली आहे.पूल पाडण्यासाठी एजन्सीचा शोधशहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासन एजन्सीचा मागील दोन महिन्यापासून शोध घेत आहे. मात्र अद्यापही शोध पूर्ण झाला नसल्याची माहिती आहे.पुलाची डागडूजी नाहीजुन्या उड्डाणपुलावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे. तसेच काही भाग जीर्ण झाला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या पुलावरून दुचाकी व तीन चाकी वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मात्र या पुलाची डागडूजी करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. पण, या विभागाने अद्यापही कामाला सुरूवात केलेली नाही.नवीन उड्डाणपुलावर साचते पाणीजुन्या उड्डाणपुलाची समस्या लक्षात घेत प्रशासनाने गोंदिया-बालाघाट मार्गावर नवीन उड्डाणपूल तयार केला. मात्र हा पूल सुध्दा सदोष असून या पुलाचा उतार चुकीचा तर दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केलेला नाही.पावसाळ्यात पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यामुळे हा पूल देखील वाहतुकीस सुरक्षीत नाही.