शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या लग्नाची काळजी कशाला? जर कन्यादान योजना आहे साथीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 16:40 IST

सामाजिक न्याय विभागाची योजना : दाम्पत्य, संस्थांनाही मिळणार आता अनुदान; साहित्य खरेदीसाठी शासनाकडून अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : लग्नसमारंभावर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी मागासवर्गीयांचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. यामुळे संबंधित कुटुंबांच्या खर्चाची बचत होते. शिवाय, विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या संस्था आणि सहभागी दाम्पत्यांना कन्यादान योजनेंतर्गत अर्थसाहाय्य देण्यात येते.

विवाह समारंभ पार पाडणे म्हणजे मोठी आर्थिक तजवीज करावी लागते. प्रत्येक पालक आपल्या ऐपतीनुसार पैसा खर्च करतो. अनेकदा गरीब कुटुंबातील पालकांना आपल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी दुसऱ्यापुढे मदतीसाठी हात पसरावे लागते किंवा त्यांना दुसऱ्याकडून कर्ज काढावे लागते. कर्ज देणारेही त्याच्या ऐपतीचा विचार करून कर्ज नाकारतात. अशा वेळी काय करावे, असा प्रश्न त्या पालकांसमोर असतो. गत अनेक वर्षापासून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने कन्यादान योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केल्यास जेवणावळीसह मंडपाचाही खर्च बचत होतो. शिवाय, संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी शासनाकडून अनुदान प्रत्येक दाम्पत्याला दिले जाते. याशिवाय, संस्थांनाही शासकीय मदत मिळते.

वर्षभरात कोणाला किती मिळाले अनुदान? मागील वर्षभरात जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये कन्यादान योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळे झाले नाहीत. त्यामुळे कुणीच अनुदानास पात्र ठरले नाही.

संस्थांना चार हजार, दाम्पत्याला २० हजार कन्यादान योजनेअंतर्गत विवाह सोहळा पार पाडणाऱ्या संस्थांना प्रति जोडपे ४ हजार रुपये, तर दाम्पत्याला २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

काय आहे कन्यादान योजना? 

  • मागासवर्गीय कुटुंबातील विवाह वाढत्या महागाईत कमी खर्चात व्हावे, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी कन्यादान योजना सुरू केलेली आहे. 
  • या योजनेंतर्गत दाम्पत्य व संस्थांनाही मदत दिली जाते. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून ही योजना राबविली जाते

गरीब कुटुंबांना मदत गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह करण्यासाठी कन्यादान योजना साहाय्यकारी ठरते. सदर योजनेच्या माध्यमातून विवाह सोहळा थाटात पार पाडला जातो. दाम्पत्याला संसारोपयोगी साहित्यासाठी अनुदान दिले जाते.

काय आहेत अटी? कन्यादान योजनेत सहभागी होण्यासाठी वधू-वरांचे वय कायद्याच्या चौकटीत बसणारे असावे. तसेच पालकांकडून तसे संमतीपत्र सादर करणे आवश्यक आहे. संस्था ही नोंदणीकृत असावी, तेव्हाच सदर संस्था कन्यादान योजनेसाठी पात्र ठरते.

"कन्यादान योजनेंतर्गत संस्था व दाम्पत्याला अनुदान दिले जाते. सदर योजनेचा लाभ संस्था व दाम्पत्यांनी घ्यावा."- विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाgondiya-acगोंदिया