शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय उद्यानाच्या संजयकुटीत वाळवीचे साम्राज्य,लक्ष देणार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

सुरुवातीच्या काळात संजयकुटी ही इमारत संपूर्णतः लाकडी होती. ही इमारत एकांतवासात असल्याने पर्यटक येथे आकर्षणापोटी आवर्जून हजेरी लावतात. काही वर्षांपूर्वी या इमारतीला अशीच वाळवी लागली होती. तेव्हा ज्या लाकडांवर ही वास्तू उभी होती ते मोठे लाकडी खांब काढून त्याऐवजी सिमेंटचे खांब उभारण्यात आले होते. या खांबांच्या खालच्या भागापासून तर अगदी टोकापर्यंत वाळवीचे थर दिसून येत आहेत. सिमेंटच्या खांबांवर लाकडी व बांबूने तयार केलेली वास्तू आहे.

संतोष बुकावन लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात असलेल्या संजयकुटीत वाळवीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी वर्ग दोन पासून तर वर्ग चारचे अनेक कर्मचारी नियुक्त आहेत. यांच्यावर शासनाचे दरमहा लाखों रुपये खर्च होतात. मात्र त्यांच्या निष्क्रियतेमुळे राष्ट्रीय उद्यानातील वास्तूला धोका निर्माण झाला आहे.         राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्गरम्य परिसरात संजयकुटी नामक वास्तू आहे. ही इमारत व सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक नौकाविहार अथवा स्वतःच्या साधनाने तिथे जातात. या इमारतीचे लोकार्पण तत्कालीन वन, स्वास्थ व पाटबंधारे राज्यमंत्री सतीश चतुर्वेदी तसेच महसूल, पुनर्वसन व राजशिष्टाचार मंत्री अजहर हुसेन यांचे हस्ते २१ डिसेंबर १९८१ रोजी झाले होते.  सुरुवातीच्या काळात संजयकुटी ही इमारत संपूर्णतः लाकडी होती. ही इमारत एकांतवासात असल्याने पर्यटक येथे आकर्षणापोटी आवर्जून हजेरी लावतात. काही वर्षांपूर्वी या इमारतीला अशीच वाळवी लागली होती. तेव्हा ज्या लाकडांवर ही वास्तू उभी होती ते मोठे लाकडी खांब काढून त्याऐवजी सिमेंटचे खांब उभारण्यात आले होते. या खांबांच्या खालच्या भागापासून तर अगदी टोकापर्यंत वाळवीचे थर दिसून येत आहेत. सिमेंटच्या खांबांवर लाकडी व बांबूने तयार केलेली वास्तू आहे. ही वाळवी बहुधा लाकडांवर अधिक दिसून येते. त्यामुळे सिमेंटच्या टोकावरून लाकूड अथवा बांबूपर्यंत पोहोचणे अगदी शक्य आहे. यामुळे ही वास्तू वाळवीने पोखरून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.            राष्ट्रीय उद्यान व येथे उपलब्ध असलेल्या प्रत्येक बाबींच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी नियुक्त आहेत. त्या कर्मचाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कर्मचारी केवळ स्वतःचे उदरभरण करण्याच्या उद्देशाने वेतनासाठीच नियुक्त आहेत का ? असा प्रश्न पर्यटक विचारत आहेत.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्यforest departmentवनविभाग