शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पांढरी आरोग्य केंद्र आॅक्सीजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:28 IST

एकीकडे केंद्र व राज्य सरकार आरोग्य विषयक नवीन योजना आणीत आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असून खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे आहे.

ठळक मुद्देरिक्त पदाचे ग्रहण : रुग्ण उपचारापासून वंचित, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : एकीकडे केंद्र व राज्य सरकार आरोग्य विषयक नवीन योजना आणीत आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असून खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे आहे.प्राप्त माहितीनुसार रविवारी (दि.२) सकाळी ८ वाजता सुमारास हिमाली सेवक नाकाडे (२०) रा. मालीजुंगा हिला नाजूक स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी येथे आणण्यात आले. त्या वेळी आरोग्य केंद्रामध्ये एकही प्रभारी अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाला १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका मागवून रुग्णाला गोंदिया येथे नेण्याची वेळ आली. दरम्यान या प्रकाराची दखल घेत सरपंच, पोलीस पाटील, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व जिल्हा परिषद सदस्य व गावकºयांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तसेच तालुका वैद्यकीय अधिकाºयांना प्रभारी डॉक्टर आरोग्य केंद्रात अनुपस्थित असल्याबाबत जाब विचारला. तेव्हा डॉ. मेश्राम यांनी सदर डॉक्टर ट्रेन सुटल्यामुळे रुग्णालयात पोहचू शकले नसल्याचे सांगितले.मेश्राम यांच्या उत्तराने गावकºयांमध्ये रोष वाढला त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाºयांना फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या वेळी गावकºयांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. रुग्णांना योग्य आरोग्य सेवा न देणाºया डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी अंतर्गत नियमित कर्मचाºयांची ३० पदे मंजूर असून यापैकी ६ पदे रिक्त आहेत. कंत्राटी कर्मचाºयांचे १७ पदे मंजूर असून ४ पदे रिक्त आहेत.दोन वैद्यकीय अधिकाºयाची पदे मागील काही वर्षापासून रिक्त आहेत. कंत्राटी डॉक्टरांवर प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार आहे. ते सुध्दा कधी येतात तर कधी येत नाही. त्यामुळे बरेचदा रुग्णांना उपचाराविनाच परत जावे लागते. मात्र यासर्व गोष्टींकडे जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप गावकºयांनी या वेळी केला. तसेच प्रशासनावर रोष व्यक्त केला.वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची रिक्त पदे भरण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष विजय बिसेन, सल्लू पठाण, सरपंच प्रतिभा मेश्राम, ग्रा.पं.सदस्य विलास बगडकर, रवि मेरगवार, दिलीप डागा, एकनाथ फुंडे, पोलीस पाटील अनिल मेंढे, निला ढोरे, पोलीस पाटील उत्तम कोटांगले, देवेंद्र तुरकर, विजय अग्रवाल यांनी या वेळी केली.