शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

तो बंधारा ठरतोय पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:20 IST

तिरोडा तालुक्यातील नवेझरी मार्गावरील रिसाळा नाल्यावर २४ लाख रुपये खर्चून बंधारा तयार करण्यात आला. मात्र बंधाºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

ठळक मुद्दे२४ लाख रुपयांचा खर्च व्यर्थ : शेतकरी सिंचनापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी मार्गावरील रिसाळा नाल्यावर २४ लाख रुपये खर्चून बंधारा तयार करण्यात आला. मात्र बंधाºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. परिणामी हा बंधारा शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे.तिरोडा तालुक्यातील नवेझरी-लोणारा मार्गावरील नाल्यावर रिसाळा तलावाच्या खोºयातून जाणाºया नाल्यावर लघुसिंचन जलसंधारण उपविभागाअंतर्गत नवेझरी येथे २४ लाख ७७ हजार ७३९ रुपये खर्च करुन कोल्हापूरी बंधारा तयार करण्यात आला. मात्र या बंधाऱ्यात सध्या स्थितीत एकही थेंब पाणी नाही.बंधाºयाला भेगा पडल्या असून त्यातून पाणी पाझरते. याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भांडारकर यांनी सहायक अभियंता सोनिया जाधव, कार्यकारी अभियंता पी. वी. देवगडे यांना लेखी व तोंडी तक्रार केली. मात्र अधिकाºयांनी त्याला केराची टोपली दाखवित दुर्लक्ष केले.लघू सिंचन व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आहे. २४ लाख रुपये खर्च करुन देखील बंधाऱ्यांला भेगा पडल्या आहेत. बंधाºयाच्या शेवटच्या टोकावर उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. बंधाºयाचा शेतकºयांना कुठलाच उपयोग होत नाही.५० एकर क्षेत्र सिंचनापासून वंचितया बंधाºयात पाणी साचले असते तर ५० एकर शेती ओलीताखाली आली असती. मात्र या विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे एक एकर शेतीला सिंचन होत नसल्याचे चित्र आहे. शासनतर्फे शेतकºयांसाठी नाल्यावर बंधारे तयार केले जाते. पण कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाºयांमुळे हे बंधारे शेतकºयांसाठी केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.बांधकामाच्या चौकशीची मागणीया बंधाºयाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला आहे. त्यामुळे बंधाºयाच्या बांधकामाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी नवेझरी येथील शेतकºयांनी केली आहे.