शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसेसचे स्पीड गव्हर्नर गेले कुठे?

By admin | Updated: May 13, 2014 23:41 IST

स्कूल बसेसचे वाढते अपघात लक्षात घेऊन त्यावर आळा घालण्याकरिता परिवहन विभागाने स्कूल बसेसला वेगर्मयादा व डोअर सायरन लावणे अनिवार्य केले आहे.

गोंदिया : स्कूल बसेसचे वाढते अपघात लक्षात घेऊन त्यावर आळा घालण्याकरिता परिवहन विभागाने स्कूल बसेसला वेगर्मयादा व डोअर सायरन लावणे अनिवार्य केले आहे. यासंबधीचे आदेश परिवहन उपायुक्तांनी निर्देश ५ एप्रिल २0११ रोजी राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहे.

स्कूल बसकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाने काही नियम लागू केले होते. मात्र या नियमांचे पालनच केले जात नव्हते. त्यामुळे स्कूल बसेसच्या अपघातांची संख्या बरीच वाढली होती. या घटनांमध्ये राज्यातील शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांंंचा बळी गेला. मात्र तरीही याबाबत ज्या विभागांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी होती ते विभागच गप्प बसले असल्याने स्कूल बसेसच्या अपघातांची संख्या बरीच वाढली होती.

यावर सर्व स्तरातून ओरड झाल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले. यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल बसेसकरिता नियमावली तयारी केली. तसेच सर्व स्कूल बस संचालकांना नोटीस देऊन त्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश ५ एप्रिल २0११ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार दिले होते. या नियमांमध्ये परिवहन आयुक्तांनी यावर्षी पुन्हा सुधारणा केली आहे. यासंबंधीचे आदेश परिवहन उपआयुक्तांनी राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. यात स्कूल बससाठी वेगर्मयादा ६0 कि.मी. प्रतितास निर्धारित करण्यात आली असून याकरिता ‘स्पीड गव्हर्नर’ हे यंत्र लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विद्यार्थी स्कूल बसमध्ये चढताना व उतरताना अपघात किंवा विद्यार्थ्यांंंना कुठलीही हानी पोहोचू नये याकरिता बसच्या दरवाज्याला सायरन व डाव्या बाजूला चालकाच्या लक्षात येईल या दृष्टीने मोठा आरसा लावण्याची सूचनाही देण्यात आल्या होत्या. यामुळे चालकाला विद्यार्थी बसमध्ये चढत व उतरत असल्याचे दिसेल. याच बरोबर प्रत्येक स्कूल बसमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र असणे अनिवार्य करण्यात आले होते.

शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्‍चित करणे या बाबीकडे लक्ष देण्याकरिता प्रत्येक शाळेत एक परिवहन समिती नियुक्त करण्यात यावी. तसेच ही समिती नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणत्र, वाहन चालविण्याचा परवाना आदी कागदपत्रांची तपासणी करेल. या समितीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक असेल व एक पालक शिक्षक संघाचा प्रतिनिधी, वाहतूक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी आदींचा समावेश असेल. यासह अन्य नियमदेखील लागू केले होते.

विशेष म्हणजे स्कूल बसेसमध्ये स्पीड गर्व्हनर व डोअर सायरन आणि मोठा आरसा लावण्याकरिता मुदत देण्यात आली होती. परंतु वर्ष लोटूनही स्पीड गव्हर्नर लावण्यात आले नाही. (तालुका प्रतिनिधी)