शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या बँक खात्यात येणारे १५ लाख रुपये गेले कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 22:07 IST

आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे आश्वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. सत्तेवर येवून चार वर्षांचा कालावधी लोटत आहे. मात्र १५ लाख रुपये सोडा १५ रुपये सुद्धा नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाले नाही.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : सुकडी येथे प्रचार सभा, कार्यकर्त्यांमध्ये जोश

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे आश्वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. सत्तेवर येवून चार वर्षांचा कालावधी लोटत आहे. मात्र १५ लाख रुपये सोडा १५ रुपये सुद्धा नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे या सरकारला केवळ मोठी आणि खोटी आश्वासन देण्याचे काम चांगले येते. अशा सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपा-पिरीपा आघाडीचे उमेदवार अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिरोडा तालुक्यातील सुकडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला संबोधित करताना ते बोलत होते. आ. दिलीप बंसोड, तिरोडा तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेलाल पटले, प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, तिरोडा तालुका काँग्रेस दलित आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र जांभुळकर, जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी विलास मेश्राम, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष धनराज पटले, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, माजी सभापती डॉ. किशोर पारधी, जि.प.सदस्य प्रिती रामटेके, मनोज डोंगरे, कैलास पटले, विणा बिसेन, सुनिता मडावी, सभापती निता रहांगडाले, उपसभापती मनोहर राऊत, सरपंच जयश्री गभणे, सरपंच प्रभा जांभूळकर,जगणलाल धुर्वे, इंद्रकला बावनथडे, बबलदास रामटेके, प्रल्हाद दखने, रामचंद्र गभरे, उषा बिसेन, उषा तुमसरे, अर्चना धुर्वे, जयश्री चंद्रीकापुरे, डॉ.अविनाश जायस्वाल, बंडू मरस्कोल्हे, दिनेश टेकाम, रवि पटले, हिवराज चौधरी, भूमेश्वर रंगारी, राजेश मेश्राम, संजय चंद्रिकापुरे, दिलीप बावनथडे उपस्थित होेते. पटेल म्हणाले, केंद्र व राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, बेरोजगारी कमी करु, महागाई नियंत्रणात, विदेशातील काळा पैसा आणू, जीवनावश्यक वस्तुंचे दर आटोक्यात आणू असे आश्वासन सत्तारुढ सरकारने दिले होते. मात्र प्रत्यक्षात यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे.भंडारा गोंदिया क्षेत्राच्या विकासासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपा-पिरीपा आघाडीचे उमेदवार अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन पटेल यांनी केले. जगनलाल धुर्वे, विलास मेश्राम, हितेंद्र जांभुळकर, धनलाल पटले, बबलदास रामटेके, प्रेमकुमार रहांगडाले, डॉ. किशोर पारधी यांनी मार्गदर्शन केले.या सभेला हजारोच्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सरपंच रवि पटले यांनी केले तर आभार प्रल्हाद दखने यांनी आभार मानले. खा. प्रफुल्ल पटेल यांनी अर्जुनी, पालडोंगरी, कवलेवाडा, मुंडीकोटा, नवेझरी, वडेगाव येथे आयोजित प्रचार सभांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल