गोंदिया : सन २००४ ते २०१४ पर्यंत आम्ही शासनात असताना शेतकऱ्यांच्या हितात अनेक कृषीविषयक कार्य केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे योजना, असे अनेक कामे केली. मात्र ज्यांच्यावर जनतेने विश्वास ठेवून निवडून दिले ते लोकप्रतिनिधी आता कुठे बेपत्ता झाले? असा सवाल खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.गोरेगाव तालुक्याच्या हिराटोला येथे मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या कृषी संजिवनी २०१५ संमेलनाचे उद्घाटन प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.खा.पटेल पुढे म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगार देणारे अदानी पॉवर प्रोजेक्ट आम्ही सुरू केले. या क्षेत्रात अनेक विकास कार्य घडवून आणले. परंतु जनतेने विश्वास केलेले प्रतिनिधी आता कुठे गायब झाले. जनतेचे विश्वास न मिळल्यावरही आम्ही अनेकदा आपली उपस्थिती लोकांमध्ये दर्शविली. केवळ राजनितीच करणे हे आमचे ध्येय नसून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेशी आमचा लगाव आहे, असे ते म्हणाले.या वेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, आ. प्रकाश गजभिये, विजय राणे उपस्थित होते.मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे संस्थापक कैलाश डोंगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे कार्य व उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडून संस्थेसाठी सहकार्य मागितले व पटेलांनीही ते सहर्ष स्वीकार केले. अतिथी म्हणून सोमेश्वर रहांगडाले, बाबा बहेकार, सरपंच सीमा पटले, कल्पना बहेकार, जनार्दन सिंगाडे, बघेले, प्रा. सुचित लाकडे, बाबुलाल बिसेन, भोजू ब्राह्मणकर, प्रल्हाद बिसेन, सूर्यकांत डोंगरे, रमन हुमे, दिलीप मून आदी उपस्थित होते. संचालन प्रा. शैलेश डोंगरे यांनी तर आभार जनार्दन शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
कुठे गेले जनतेचे विश्वासपात्र प्रतिनिधी?
By admin | Updated: February 20, 2015 01:26 IST