शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

स्मशान शेड केव्हा तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा नवेगावबांध : वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गावात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांना जखमी करणे किंवा ठार ...

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

नवेगावबांध : वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गावात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांना जखमी करणे किंवा ठार करणे सुरू केले आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण कारागीरांवर उपासमारीचे संकट

सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आला असल्याचे दिसत आहे.

कलावंतांना मानधनास आताही विलंबच

गोंदिया : ५० वर्ष वय झाले की शासनाकडून वृद्ध कलावंत मानधन योजनेचा लाभ कलाकाराला मिळतो. पण गेल्या काही महिन्यांपासून समाजकल्याण समिती स्थापन केली नसल्याने मानधनास विलंब आहे.

दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

गोंदिया : येथील रेल्वेस्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधी पसरते. त्यामुळे या परिसरात घाणच घाण पसरून दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते.

कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष

केशोरी : येथील ग्रामपंचायतस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकांत कचरापेट्या बसविण्यात आल्या. मात्र, या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यावरून ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे किती दुर्लक्ष आहे हे दिसून येते.

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला

सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे. ग्रामीण मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांकडून ग्रामीण भागांत लूट केली जाते.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा

तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा त्रास होत आहे.

बाजारात वीज व्यवस्थेची मागणी

सइक अर्जुनी : येथील गावात आठवडी बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिपरी, कोहमारा या रस्त्याला मार्गक्रम आहे. या रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते तसेच येथील वॉर्ड क्रमांक ३ सर्व जनता याच मार्गावरती ये-जा करत असतो.

तेंदूपत्त्याचे बोनस त्वरित द्या

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथील फळीवर सन २०१९ मध्ये तेंदूपत्ता नेणाऱ्या लोकांना बोनस अजूनपर्यंत न मिळाल्याने तो त्वरित देण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.

निराधारांचे अनुदान त्वरित द्या

शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील ३-४ महिन्यांपासून खात्यात अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

केव्हा तयार होणार प्रमुख रस्ता

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी गावाच्या मध्यभागातून रस्ता असल्याने येथे वर्दळ असून धोका वाढला आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून बायपास रस्ता अजूनही तयार झाला नाही.

रस्ता बांधकामामुळे अपघातांत वाढ

बिरसी-फाटा : बारबरीक प्रोजेक्ट कंपनीच्या माध्यमातून गोदिया-रामटेक या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. पण, बिरसी ते तिरोडा दरम्यान रस्ता बांधकामामुळे अपघातांच वाढ झाली आहे.

दिवसाही सुरू असतात पथदिवे

गोंदिया : नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भर दिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगरपरिषदेवर विजेचा भुर्दंड बसत असतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.