शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्याचा छळ अधिकाºयावर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:35 IST

येथील जि.प.कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा कक्ष अधिकाऱ्यांकडून छळ केला जात आहे. याची लेखी तक्रार सदर महिला कर्मचाऱ्याने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.शिवाय हा मुद्दा जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत सुध्दा उपस्थित करण्यात आला. मात्र यानंतर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने सदर महिला कर्मचाऱ्याने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.

ठळक मुद्देजि.प.मधील प्रकार : महिला आयोग्याकडे तक्रार, वरिष्ठांची बघ्याची भूूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील जि.प.कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा कक्ष अधिकाऱ्यांकडून छळ केला जात आहे. याची लेखी तक्रार सदर महिला कर्मचाऱ्याने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.शिवाय हा मुद्दा जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत सुध्दा उपस्थित करण्यात आला. मात्र यानंतर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने सदर महिला कर्मचाऱ्याने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.छळ करणारा अधिकारी जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागात सहायक प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत आहे.तर महिला कर्मचारी ही आरोग्य विभागात लिपीक पदावर कार्यरत आहे.या महिला कर्मचाºयाला सदर कक्ष अधिकारी खाजगी भ्रमणध्वनीवर फोन करुन विभागात बोलावून अकार्यालयीन भाषेचा करुन अपमानास्पद वागणूक देवून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे. या प्रकराची तक्रार पिडीत महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, मुकाअ आणि महिला आयोगाला केली आहे. मात्र यानंतर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. यानंतरही सदर अधिकाºयाकडून महिला कर्मचाºयाला त्रास देण्याचा प्रकार सुरूच आहे.सदर अधिकारी माझे कुणीही काहीही बिगडवू शकत नाही,मी जे बोलतो तेच सीईओ करतील अशी धमकी महिला कर्मचाऱ्याला देत असल्याचा आरोप केला आहे.कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तणूकसदर अधिकारी हा अनेक महिला कर्मचाऱ्यांसोबत अशीच वर्तणूक करुन दबाव तयार करतो. जि.प.मधील अनेक महिला कर्मचारी याप्रकारमुळे त्रस्त असून मानसीक दडपणाखाली काम करीत आहे.महिलांना धमक्या देणे, छळ करणे, याबाबत अनेक तक्रारी करुन सुध्दा सदर अधिकाऱ्यावर कुठलीच कारवाही केली जात नसल्याने कर्मचाºयांमध्ये रोष व्याप्त आहे.जि.प.सदस्य लावून धरणार मुद्दाजि.प.महिला कर्मचाऱ्याचा छळ होत असल्याची तक्रार करुन सुध्दा सीईओनी अद्याप कुठलीच कारवाई केली नाही.त्यामुळे शुक्रवारी आयोजित सर्वसाधारण सभेत हा मुद्दा लावून धरण्याची तयारी जि.प.सदस्यांनी केली आहे. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.स्थायी समितीच्या सभेत गाजला विषयया प्रकरणाची दखल जिल्हास्तरीय महिला तक्रार निवारण सेल, गोंदिया यांनी घेवून पिडीत महिला व अन्य कर्मचाºयांचे बयाण नोंदविले आहे. स्थायी समितीच्या सभेत स्थायी समिती सदस्य सुरेश हर्षे, गंगाधर परशुरामकर यांनी उपस्थित करुन सदर अधिकाºयावर कारवाही करण्याची मागणी केली.मात्र यानंतरही सीईओ सदर अधिकाऱ्यावर कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदर अधिकाऱ्याला तीन दिवसात निलंबीत करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही कारवाई झाली नाही. त्यामुळे हा मुद्दा शुक्रवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करुन कारवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्ताव आणू.-सीमा मडावी जि.प.अध्यक्ष.या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाºयावर कारवाही करण्यात येईल.- नरेश भांडारकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग जि.प.