शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे; परंतु कोरोनामुळे केवळ दुपारी ...

गोंदिया : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे; परंतु कोरोनामुळे केवळ दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने उघडण्याची परवानगी आहे. त्यामुळे मोबाइलची दुरुस्ती करण्यासाठी मोबाइलच्या दुकानांत रांगा दिसून येतात. आता निर्बंध शिथिल केल्यामुळे मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी लोकांची लगबग सुरू आहे. राज्य सरकारने ४ एप्रिलपासून संचारबंदी सुरू केली होती. त्यामुळे सर्वजण घरी राहू लागले. दरम्यान, वेळ घालविण्यासाठी आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांचा मोबाइल हाच एकमेव आधार होता. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन क्लासेस, नेट बँकिंग यासोबतच कोरोना रुग्णांची चौकशी करण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच लसीकरण नोंदणीसाठी सर्वच जण मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सततच्या वापराने व अन्य कारणांमुळे मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड आला आहे; परंतु लॉकडाऊनमुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद होती. त्यासोबतच ऑनलाइनने मोबाइलचे सुटे पार्ट मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद आहेत. आता जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले, त्यामुळे मोबाइलच्या दुकानांत गर्दी दिसून येत होती.

.......................................

कारणे काय?

-सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड झाला. मोबाइल स्क्रीन गार्ड खराब झाले,

फोन आल्यास आपल्याला आवाज येत नाही किंवा इकडून फोन केल्यास आवाज जात नाही.

चार्जिंग केल्यावरही बॅटरी लवकर उतरते, मोबाइल पडल्याने डिस्प्ले फुटला, त्यामुळे मोबाइल वापरायोग्य नाही. ऑटोमॅटिक इतरांना फोन लागणे, टच काम न करणे आदी समस्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी मोबाइलला कव्हर लावणे, मोबा्यल स्वीच ऑफ होणे, अशा विविध तक्रारी आल्या आहेत.

.............................

दोन महिने बाजारपेठ बंद

कोरोनामुळे पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. लाट ओसरत असताना लॉकडाऊन हटविल्यानंतर काही प्रमाणात स्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्याने सर्व बंद करण्यात आले. त्यामुळे दोन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती करता आली नाही. परिणामी अनेकांचे मोबाइल बंद पडले.

...................................

दोन महिने बाजारपेठ बंद

मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये व यंदाही आम्हाला आमचे मोबाइल दुकान बंद ठेवावे लागले. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला. घर चालविणे कठीण झाले. माेबाइलधारकांच्याही समस्या वाढल्या; परंतु आमचे दुकानच बंद असल्याने हातात कवडी नाही, असे मोबाइल दुरुस्ती करणारे आमगाव येथील लोकेश बोहरे यांनी सांगितले.

...............................

मोबाइल महत्त्वाचा, पण आरोग्य

आजघडीला मोबाइल हा आपला अविभाज्य अंग झाला आहे; परंतु सततच्या वापराने मोबाइलमध्ये बिघाड झाला आहे. आता सकाळी ७ ते २ या वेळेत मोबाइल दुकानेही सुरू राहणार आहेत, त्यामुळे मोबाइल दुरुस्त करण्यासाठी मी दुकानात जाईल.

-दीपक भांडारकर, मोबाइलधारक

.........................

अनेकांचे मोबाइल बिघडल्याने दुरुस्तीसाठी दुकानात जात आहेत; परंतु गर्दी करू नये, अन्यथा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही. मोबाइल जरी महत्त्वाचा असला तरी आपले आयुष्य त्यापेक्षा किमती आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी करणे योग्य नाही.

- अश्वीन हुमे, मोबाइलधारक आसोली

........................

दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक ग्राहक मोबाइल दुरुस्तीसाठी फोन करतात; परंतु सुटे सामान येत नसल्याने दुरुस्ती बंद आहे. आता दुकाने सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.

-हितेश सोनवणे, मोबाइल दुकानदार आमगाव

........................

कोरोनाच्या संसर्गामुळे मोबाइल दुकान बंद होते. आजघडीला मोबाइल अत्यावश्यक सेवेत आणायला हवा. संपर्काचे प्रमुख आणि प्रभावी साधन म्हणून मोबाइल आहे. एखाद्याचा मोबाइल बिघडला, तर ते मोबाइलशिवाय राहूच शकत नाहीत.

दुरुस्तीसाठी माझ्याकडे शेकडो मोबाइल आले आहेत.

- भुमेश बागडे, मोबाइल दुकानदार पदमपूर