शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! दीड वर्षात तीन गावात कोरोनाचा शिरकावच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील कुलपा, आमगाव तालुक्यातील करंजी आणि गोरेगाव तालुक्यातील सटवा या तीन गावांनी अद्यापही कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करू दिला नसून दीड वर्षात या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य, महसूल आणि जिल्हा परिषद या तिन्ही विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. राज्य शासनाने अलीकडेच आतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळलेल्या गावाला कोरोनामुक्त गाव योजनेंतर्गंत पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणात आली माहिती पुढे : २१ गावात एक ते दाेनच रुग्णांची नोंद

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाने सर्वत्र कहर केला. अशात गोंदिया जिल्ह्यात २७ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जवळपास जिल्हा कोरोनामुक्त होता. मे महिन्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आणि रुग्ण संख्येचा आलेख मागील दीड वर्षात तब्बल ४१ हजार रुग्ण संख्येवर पोहचला. कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढ असताना जिल्ह्यातील तीन गावांनी अद्यापही कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नसून कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील कुलपा, आमगाव तालुक्यातील करंजी आणि गोरेगाव तालुक्यातील सटवा या तीन गावांनी अद्यापही कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करू दिला नसून दीड वर्षात या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य, महसूल आणि जिल्हा परिषद या तिन्ही विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. राज्य शासनाने अलीकडेच आतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळलेल्या गावाला कोरोनामुक्त गाव योजनेंतर्गंत पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेला आपल्या जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांची माहिती मागविण्यात आली होती. याच अनुषंगाने सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि आशा सेविकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांची माहिती संकलित करण्यात आली. ज्या गावात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, एक ते दोन रुग्ण आढळलेले गाव, गावातल्या गावातच उपचार करून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि गावांची नावे आदीची माहिती गोळा करण्यात आली. यात जिल्ह्यातील कुलपा, करंजी, सटवा या तीन गावांमध्ये मागील दीड वर्षांपासून अद्यापही एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ही तिन्ही गावे आता कोरोनामुक्त गाव स्पर्धेत आहे. 

कोरोनाला वेशीवरच रोखलेn मागील दीड वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव न झालेल्या कुलपा, करंजी, सटवा या तीन गावांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले. गावबंदी, कोरोना संसर्गाच्या काळात बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेशबंदी, मास्क, सॅनिटायझरचा वापर,गावात जंतूनाशक फवारणी, ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करून औषधोपचार, गावकऱ्यांमध्ये आरोग्य विभाग व ग्रामपंचायतच्या माध्यामातून जनजागृती केली. 

त्या गावांमध्ये एक ते दोनच रुग्णांची नोंद - जिल्ह्यातील २१ गावांमध्ये मागील दीड वर्षांत केवळ एक दोनच कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांनी गावातल्या गावात औषधोपचार घेऊन कोरोनावर मात केल्याची बाब पुढे आली आहे. एक ते दोनच रुग्ण आढळलेल्या गावांची सुध्दा माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. गावकऱ्यांची सतर्कता आली कामी- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना आणि आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये सुध्दा रुग्ण संख्येत वाढ होत असताना आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी सजग राहून काळजी घेतली. त्यामुळेसुध्दा कोरोनाला वेशीवरच रोखण्यात यश आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या