शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता...23 किमीच्या रस्त्यावर तब्बल 1463 खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

गोंदिया ते आमगाव हे अंतर २५ कि.मी.चे आहे. परंतु आमगावपासून किंडगीपार नाल्यापर्यंत दोन कि.मी.चा सिमेंटचा पक्का रस्ता तयार आहे. परंतु किंडगीपार नाल्यापासून किंडगीपार रेल्वे चौकी या अर्धा कि.मी.च्या रस्त्यात तब्बल १५० खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले. किडंगीपारच्या डोयेवाडाजवळ असलेल्या खड्ड्यात अनेक व्यापाऱ्यांचा व तरुणांचा खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या नावावर पैसे नसल्याचा कांगावा करून विकास कामांना खिळ घालण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. दररोज हजारो लोकांची वर्दळ असलेल्या गोंदिया- आमगाव मार्गावरील केवळ २३ कि.मी.च्या अंतरात तब्बल १४६३ खड्डे पडले आहेत. हे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. एक खड्डा वाचविण्याच्या नादात वाहन दुसऱ्या खड्ड्यात जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी पाऊल उचलत नाही. या रस्त्यावर बसलेला यमराज कधी कुणाचा बळी घेईल हे सांगता येत नाही.गोंदिया ते आमगाव हे अंतर २५ कि.मी.चे आहे. परंतु आमगावपासून किंडगीपार नाल्यापर्यंत दोन कि.मी.चा सिमेंटचा पक्का रस्ता तयार आहे. परंतु किंडगीपार नाल्यापासून किंडगीपार रेल्वे चौकी या अर्धा कि.मी.च्या रस्त्यात तब्बल १५० खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले. किडंगीपारच्या डोयेवाडाजवळ असलेल्या खड्ड्यात अनेक व्यापाऱ्यांचा व तरुणांचा खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाला. किंडगीपारच्या चौकीपासून ठाणापर्यंतचा रस्ता थोडा बरा आहे. परंतु ठाणापासून तर दहेगाव या दोन कि.मी.चा रस्ता खड्ड्यातच आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. अदासी येथील सावरकारटोलीपासून अदासीपर्यंत जागोजागी खड्डे असल्याने या खड्ड्यांनी लोकांची बळी घेतला आहे. रात्रीच्यावेळी अंधारामुळे हे खड्डे दिसत नाहीत परिणामी खड्ड्यात पडून वाहन चालक जखमी झाले आहेत. स्वत: पडल्याने ते तक्रार करायला पुढे येत नाहीत. अदसी ते खमारीपर्यंतचा रस्ता थोडा बरा आहे. परंतु खमारीच्या पुढे असलेल्या भरतटोली परिसरातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. गोंदियाच्या फुलचूर येथील रस्त्यावर मोठे खड्डे असून या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनाचे संतुलन बिघडले. या रस्त्यावरून स्वत: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुकाअ व जिल्ह्यातील सर्वच मोठे व लहान अधिकारी ये-जा करतात. तरीही त्यांचे या रस्त्याकडे लक्ष नसेल असे वाटते. रस्त्याची हालत खस्ता झाली असून या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पुढे येत नाही. 

 रस्त्यावरील खड्डे अजून किती बळी घेणार ?- गोंदिया ते आमगावच्या किडंगीपार या २३ कि.मी.च्या अंतरात १४६३ खड्डे आहेत. लोकमत प्रतिनिधीने स्वत: या रस्त्यावरील खड्डे मोजून हा प्रकार पुढे आणला. उदासीन असलेल्या प्रशासनाने जागे व्हा हा नागरिकांचा सूर त्यांच्या कानापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. या रस्त्यावरील खड्ड्यांनी अनेकांचा जीव घेतला. हा रस्ता आणखी किती बळी घेणार असा सवाल नागरिक करीत आहेत.

 

टॅग्स :highwayमहामार्ग