शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीवर वचक कुणाचा?

By admin | Updated: August 5, 2015 01:56 IST

तीन वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात शासनाने काही ठिकाणी पोलीस चौक्या मंजूर झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.

तीन वर्षे लोटले : मंजूर पोलीस चौकी अद्याप प्रलंबितशेंडा-कोयलारी : तीन वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात शासनाने काही ठिकाणी पोलीस चौक्या मंजूर झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात शेंडा येथे पोलीस चौकी मंजूर झाल्याचा मजकूरही होता. मात्र आता तीन वर्षांचा कालावधी लोटूनही सदर गावाला पोलीस चौकी मिळाली नाही. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी व दहशत पसरविणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यावर कुणाचाही वचक नसल्याचे दिसून येत आहे. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शेंडा येथे पोलीस चौकी देण्यात यावी, यासाठी परिसरातील जनतेने प्रसार माध्यमांद्वारे वेळोवेळी शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तरीही अद्याप पोलीस चौकी देण्यात आली नाही. सडक-अर्जुनीतील शेंडा, मसरामटोला, आपकारीटोला, कोयलारी, पांढरवानी, कोहळीपार, उशिखेडा, मोहघाटा, सालईटोला, पाटीलटोला, कन्हारपायली, प्रधानटोला, कोहळीटोला या आजूबाजूच्या खेड्यांचे शेंडा हे मुख्य गाव आहे. या परिसरात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सदर परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित दुर्गम भागात मोडतो. शहर असो किंवा गाव, प्रत्येक ठिकाणी दबंगगिरी, चोरी, डकेटी करणाऱ्या व क्षुल्लक कारणावरूं दहशत वाढविणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे झाले आहे. शासनाने तीन वर्षांपूर्वी काही ठिकाणी पोलीस चौक्या मंजूर केल्याचे वृत्त होते. त्यात शेंडा येथे पोलीस चौकी मंजूर झाल्याचा उल्लेख होता. आता तीन वर्षे लोटले तरी या गावाला पोलीस चौकी मिळाली नाही, हे दुर्दैवच.शेंडा गावावरून देवरी पोलीस ठाण्याचे अंतर २० किमी आहे. वेळी-अवेळी कोणतीही अप्रिय घटना घडल्यास साधनाअभावी वेळीच तक्रार करणे कठिण होते. अशातच चोरी करण्याऱ्यांचे अथवा गुन्हेगारांचे फावते व त्यांचे मनोबल वाढते. या परिसरातील मुख्य ठिकाण असलेले शेंडा येथे पोलीस चौकी झाली तर चोऱ्या, डकेट्या, मारपीट यासारख्या घटनेत घट होईल व जनतेला संरक्षण प्राप्त होईल, यात तीळमात्र शंका नाही. तरी जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्वरित शेंडा येथे पोलीस चौकी द्यावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)