शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पकडायला गेले गांजा, हाती लागले २० लाख रोख अन् गांजा; स्थानिक गुन्हे शाखेची दर्जेदार कारवाई

By नरेश रहिले | Updated: May 26, 2025 20:14 IST

फरार आरोपी उमेश याचा भाऊ घनश्याम अग्रवाल, त्याचे वडील मृतक हरिचंद अग्रवाल आणि इतर साथीदार १ यांच्याजवळून सन २०२१ मध्ये ७१ किलो गांजा किंमत ८ लाख ४३ हजार रुपयांचा जप्त करण्यात आला होता.

नरेश रहिले 

गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कामठा येथील उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल याच्या घरी धाड घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्कूल बॅगमध्ये विक्रीकरिता साठवून ठेवलेला ६०० ग्रॅम गांजा किंमत १२ हजार व ५०० रुपयांच्या ४ हजार नोटा (२० लाख रुपये) असा एकूण २० लाख १२ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धाड कारवाई प्रभावी राबविण्याचे निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. २५ मे रोजी वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कामठा येथे अमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई केली. फरार आरोपी उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल (२५, रा. कामठा) हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. त्याची आई ललिता अग्रवाल यांच्या समक्ष घराची झडती घेतली असता, लोखंडी कपाटात एका निळ्या रंगाच्या स्कूल बॅगमध्ये विक्रीकरिता साठवून ठेवलेला ६०० ग्रॅम ओलसर, पाने, फुले, फळे, बिया मिश्रित गांजा किंमत १२ हजारांचा माल जप्त केला. गांजाच्याच बॅगमध्ये गांजा विक्रीच्या पैशातून साठवून ठेवलेली रक्कम ५०० रुपयांच्या ४ हजार नोटा एकूण २० लाख रुपये जप्त करण्यात आले. फरार आरोपी उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल (२५, रा. कामठा) याच्याविरुद्ध पोलिस ठाणे रावणवाडी येथे पोलिस उपनिरीक्षक शरद सैदाणे यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (क), २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठांचे निर्देश सूचनेप्रमाणे पोलिस ठाणे रावणवाडी पोलिस करीत आहेत.

२०२१ मध्ये पकडला होता ८.४३ लाखांचा गांजा

फरार आरोपी उमेश याचा भाऊ घनश्याम अग्रवाल, त्याचे वडील मृतक हरिचंद अग्रवाल आणि इतर साथीदार १ यांच्याजवळून सन २०२१ मध्ये ७१ किलो गांजा किंमत ८ लाख ४३ हजार रुपयांचा जप्त करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध रावणवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.यांनी केली कारवाईस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, शरद सैदाने, हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, दुर्गेश तिवारी, सुजित हलमारे, सोमेंद्र तुरकर, संतोष केदार, कुमुद येरणे, घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे.