शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत साकारणार सुसज्ज भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 22:15 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी बाजाराकरिता शासनाने ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भाजी बाजाराचे बांधकाम केले जाणार असून मागील अनेक वर्षांपासूनचा प्रलबिंत प्रश्न मार्गी लागला आहे.

ठळक मुद्देचार कोटी रुपयांचा निधी मंजूर : गोपालदास अग्रवाल यांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी बाजाराकरिता शासनाने ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भाजी बाजाराचे बांधकाम केले जाणार असून मागील अनेक वर्षांपासूनचा प्रलबिंत प्रश्न मार्गी लागला आहे.शहरातील भाजी बाजार सध्या गंजबाजार परिसरात भरतो. भाजी बाजारात जागा नसल्याने भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागते. यामुळे वाहनचालक आणि ग्राहकांना सुध्दा मनस्ताप सहन करावा लागत होता. जागेअभावी फळ विक्रेत्यांना सुध्दा विविध अडचणीना तोंड द्यावे लागत होते. आ. गोपालदास अग्रवाल यांनी या समस्येची गांर्भियाने दखल घेत येथील भाजीबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हलवून तिथे भाजी विक्रेत्यांसाठी सुसज्ज भाजीबाजार तयार करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आ. अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनात शहरातील भाजीबाजाराची समस्या आणून दिली. तसेच सुसज्ज भाजीबाजार तयार करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत गोंदिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीबाजार तयार करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून सुसज्ज भाजीबाजार आणि कोल्डस्टोरेज तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास आणि फळ विक्रेत्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आ.अग्रवाल यांनी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला.पार्किंग प्लॉजाकरिता तीन कोटी मंजूरमार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनचालकांसह बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनासुध्दा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. वाहनतळाअभावी शहरवासीयांच्या समस्येत वाढ झाली होती. आ.अग्रवाल यांनी ही समस्या ओळखून ती मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया येथे पार्किंग प्लॉजा तयार करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शहर पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या १८ हजार ंस्के.फूट जागेवर बहुमजली पार्किंग प्लॉजा तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल