शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

धान गर्भावस्थेत असताना भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 21:51 IST

जिल्ह्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे ७० हजार हेक्टर जमीन पडीत आहे. तलाव, प्रकल्प, नाले यात पाणी नाही. जिल्ह्यात काही प्रमाणात धानाचे पीक उभे आहे.

ठळक मुद्देपरशुरामकर यांचा आरोप: शेतकºयांना संपविण्याचे सरकारचे षड्यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे ७० हजार हेक्टर जमीन पडीत आहे. तलाव, प्रकल्प, नाले यात पाणी नाही. जिल्ह्यात काही प्रमाणात धानाचे पीक उभे आहे. ते पिक वाचविण्यासाठी शेतातील विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्याची गरज आहे. परंतु विज वितरण कंपनीने ६ ते ८ तासांचे भारनियमन सुरु केले आहे. आता शेतकºयांची जात संपविण्यास सरकारने सुरूवात केल्याचा आरोप जि.प.सदस्य परशुरामकर यांनी केला आहे.जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ आहे. ३० सप्टेंबरपर्यंत १३०० मिमी. पाऊस होणे गरजेचे होते. परंतु अर्धाही पाऊस पडला नाही. पाऊसच झाला नसल्याने तलाव, बोड्या, नदी, नाले, प्रकल्प सर्वच कोरडे आहेत. काही परिसरात धानाचे पीक चांगले आहे. याला कारण शेतकºयांच्या शेतात असलेल्या विंधनविहीरी व त्यावर लावलेले पंप यामुळेच काही प्रमाणात धानाचे पीक उभे आहे. यात शेतकºयांची मेहनत व जिद्द दिसत आहे. हे पीक हातात येईल या आशेने शेतकरी आनंदात होते. पण केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी १ मिनीटही भारनियमन होणार नाही याचा कांगावा करणारे सत्तेत येताच सर्व विसरले. पीक हातात येईल एवढ्यात ६ ते ८ तासांचे भारनियमन सुरु केले. सत्तेत असणारे नेते व पदाधिकारी काही बोलावयास तयार नाही. शेतकरी देशोधडीला लागत आहे. शेतकºयांसमोर दुष्काळात तेरावा महिना उभा करुन शेतकºयांची जातच यांनी संपविण्याचा प्रयत्न सुरु केल्याची संतप्त प्रतिक्रीया भारनियमनावर जि.प.सदस्य परशुरामकर यांनी व्यक्त केली.