शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

डेल्टाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्यासाठी वेट ॲन्ड वाॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. रुग्णसंख्येतसुध्दा फारशी वाढ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच रुग्ण नाहीच्या बरोबरीत असलेल्या २६ जिल्ह्यांतील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल करून केवळ शनिवारी आणि रविवारी कडक लाॅकडाऊन ठेवण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. तसे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. 

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन व व्यापारी आदेशाच्या प्रतीक्षेत : निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने सोमवारपासून (दि. २) कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री व इतर मंत्र्यांनी दिले होते. मात्र मागील दोन दिवसात केरळ राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने व डेल्टाच्या पार्श्वभूमीवर निर्णय तूर्तास बाजूला ठेवण्यात आला असून पुन्हा आठवडाभर निर्बंध कायम ठेवण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. रुग्णसंख्येतसुध्दा फारशी वाढ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच रुग्ण नाहीच्या बरोबरीत असलेल्या २६ जिल्ह्यांतील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल करून केवळ शनिवारी आणि रविवारी कडक लाॅकडाऊन ठेवण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. तसे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. पण मागील काही दोन दिवसात रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टाचा धोका या पार्श्वभूमीवर आणखी आठवडाभर निर्बंध शिथिल न करता ते तसेच लागू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळेच सोमवारपासून (दि. २) निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील कुठलेच आदेश जिल्हा प्रशासनाला रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले नव्हते. तर यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता आणखी आठवडाभर निर्बंध कायम राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा विषय आता पुन्हा आठवडाभर लांबणीवर गेला आहे. शासन यावर नेमकी काय भूमिका घेते याकडे व्यापाऱ्यांसह सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

दीड वर्षापासून व्यापाऱ्यांना बसतोय फटका - मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असून कोरोनाच्या निर्बंधाचा फटका लहान मोठे व्यापारी आणि उद्योजकांना बसला आहे. त्यातही सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने याचा मोठा आर्थिक फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. संसर्ग आटोक्यात, मग अडचण काय ?- गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ ११ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तीन तालुके कोरोनामुक्त आहेत. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल करावे तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे करण्याची अट ठेवावी अशी मागणीसुध्दा व्यापाऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या