शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळे झाले लॉकडाऊन; पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे यंदाही संचारबंदीच्या नियमामुळे लग्नसोहळे पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्याचे चित्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे यंदाही संचारबंदीच्या नियमामुळे लग्नसोहळे पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला लग्न करण्याची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आल्याने गतवर्षी खेडोपाडी लपूनछपून होणारे विवाह सोहळेही आता लॉकडाऊन झाले आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या दिवसात दिसणारी लग्नाची धामधूम दिसेनाशी झाली आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकजण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी कोरोना संचारबंदीमुळे अक्षय तृतीयेच्या विवाह मुहूर्तावर लग्नसोहळा करण्याच्या अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. कोरोना संसर्गात दोन तासात लग्न उरकण्यापेक्षा अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. यंदाच्या लग्न सोहळ्यांमुळे लॉन व्यावसायिकांवर चांगलेच संकट आले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात लग्नाच्या ऑर्डर मिळाल्या परंतु कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लग्न समारंभ कमी लोकांमध्ये करा, असा फतवा काढण्यात आल्याने आमचा रोजगार बुडाल्याचे आमगाव येथील लॉन व्यावसायिक पुष्पकांत बहेकार यांनी म्हटले आहे. यावर्षी कोरोनात लग्न नको म्हणून बुकिंग रद्द केल्याची माहिती बहेकार यांनी दिली.

....

नियमांचा अडसर

कोरोनाचा उद्रेक असलेल्या ठिकाणी प्रशासनाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठी यंदा परवानगी दिली नाही. काही ठिकाणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठी कुणाचेही अर्ज घेतले नाहीत. विनापरवानगीने घरगुती लग्न केले तर त्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार असल्याचे सांगितले. अनेकजण लग्न पुढे ढकलत आहेत. शिवाय कोरोना चाचणी, आरटीपीसीआर चाचणी, निवडक जणांचीच उपस्थिती अशी सरकारने लग्न सोहळ्यासाठी बंधने घातली आहेत.

................................

मंगल कार्यालयांंचे गणित बिघडले

१) गोंदिया शहरात जवळपास २० ते २२ मंगल कार्यालये आहेत. परंतु, कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे मंगल कार्यालये संचारबंदीमुळे ओस पडली आहेत.

२) क्वचितप्रसंगी लग्न झालेच तरी सध्या प्रशासनाच्या जाचक अटींमुळे मंगल कार्यालयात मात्र कुणीही लग्न करत नाहीत. कमीत कमी लोकांमध्ये लग्न करायचे तर लॉन कशाला, असा विचार लोक करत आहेत.

३) लग्नात २५ वऱ्हाडी आणि दोन तासात लग्न करा, असे आदेश असल्याने अनेक लोकं लग्नासाठी टाळाटाळ करत आहेत.

४) मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मंगल कार्यालयात बुकिंग मोठ्या प्रमाणात होते. परंतु, लग्न समारंभ झालेच नाहीत.

५) पहिली कोरोनाची लाट ओसरल्यानंतर लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू झाले, त्यामुळे मंगल कार्यालयांचे बुकिंग करण्यात आले होते, ते नंतर रद्द झाले.

......

यंदा कर्तव्य नाही

माझ्या मुलीचे लग्न ५ मेला ठरले होते. पूर्ण तयारीही झाली, पाहुण्यांना पत्रिका वाटल्या. मात्र, त्यानंतर कोरोना दिवसेंदिवस वाढतच चालल्याने शेवटी नाईलाजास्तव लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व तयारी झाल्यानंतर ठरलेल्या तारखेत लग्न न झाल्याने मन निराश झाले. पण जीवाच्या भीतीपोटी लग्न पुढे ढकलावे लागले.

रामदास मेंढे, वधू पिता, गोंदिया.

लग्नासाठी प्रशासनाने २५ पाहुण्यांची परवानगी दिली आहे. परंतु, आमचे सर्व पाहुणे पकडले तरी जवळपास ५००च्यावर लोक आमचे खास आहेत. शिवाय दोन तासात लग्न कसे शक्य आहे. यापेक्षा कोरोना कमी झाल्यावरच मुलीचे धुमधडाक्यात लग्न करण्याचा निर्णय आमच्या कुटुंबाने घेतला आहे.

- पारबता मेंढे, वधू माता, गोंदिया.

................

मे महिन्यातील मुहूर्त

मे महिन्यात १४, १५, १८, २१, २३, २६ व २९ मे असे सात दिवस लग्नाचे मुहूर्त आहेत.