शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

निर्बंंधांना धुडकावून लग्नसोहळे थाटामाटात सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:10 IST

राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती बघता राज्य शासनाने लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांकडून ५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होता येणार नाहीत, असे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरात या विपरीत परिस्थिती दिसून येत आहेत. 

ठळक मुद्देलग्नसराईचा धडाका सुरूच : ना गर्दीवर नियंत्रण, ना फिजिकल डिस्टन्सिंग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यासोबतच आता जिल्ह्यातही कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. याकडे लक्ष देत राज्यासह आता जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ५० व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरात या निर्बंधांना धुडकावून लग्नसोहळे थाटामाटात आटोपले जात असल्याचे दिसून येत आहे. लग्नांमध्ये ना गर्दीवर नियंत्रण, ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन दिसून येत आहे. कोरोनाची भीती न बाळगता लग्नसोहळ्यांचा धडाका सुरूच आहे. मध्यंतरी अवघ्या राज्यातच कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र आता मागील दिवसांपासून कोरोनाचा भडका उडू लागला आहे. अवघ्या राज्यातच कोरोना पुन्हा डोके वर काढत असून जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती बघता राज्य शासनाने लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांकडून ५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होता येणार नाहीत, असे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरात या विपरीत परिस्थिती दिसून येत आहेत. कोरोना भडका पुन्हा एकदा उठला असतानाही शहरात सध्या धडाक्यात लग्नसोहळे आटोपले जात आहेत. त्यातही कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांना धुडकावून शेकडो-हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लग्न थाटामाटात उरकले जात आहेत. राज्य शासनाने ५० व्यक्तींच्या उपस्थितीची अट घातली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र हा प्रकार धोकादायक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकही तेवढ्याच निर्भयपणे अशा या लग्न सोहळ्यांमध्ये उपस्थिती लावून आपले संबंध जोपासताना दिसत आहेत. 

आता आहे कारवायांची गरज मध्यंतरी २-४ वर आलेली दररोजच्या कोरोनाबाधितांची संख्या आता मागील काही दिवसांपासून २० पार झाली आहे. म्हणजेच, जिल्ह्यातही कोरोना पुन्हा आपले डोके वर काढताना दिसत आहे. अशात जिल्हाधिकाऱ्यांनी लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावतानाच आयोजक तसेच सभागृह व लॉन संचालकांवर प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही काहीच कारवाई होत नसल्याने लग्न सोहळे धडाक्यात न घाबरता सुरूच आहेत. हा प्रकार नक्कीच धोकादायक असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कारवाई करण्याची गरज असल्याचेही आता नागरिक खुद्द बोलत आहे.

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या