शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 02:12 IST

अस्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी शौचास बसण्यामुळे अनेक आजार पसरतात. रोगराईवर मात करण्यासाठी...

जि.प. अध्यक्षांचा संकल्प : स्वच्छ भारत अभियान आढावा सभागोंदिया : अस्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी शौचास बसण्यामुळे अनेक आजार पसरतात. रोगराईवर मात करण्यासाठी आणि स्वच्छता निर्माण करण्यासाठी येत्या एक वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करू, असा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी (दि.१४) स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सभेत त्या बोलत होत्या.याप्रसंगी आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, राज्याचे स्वच्छतादूत भारत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भवर प्रामुख्याने उपस्थित होते. मेंढे पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात शौचालयासाठी शासनाचे अनुदान मिळते. प्रत्येक घरी शौचालय उभे झाले पाहिजे, यासाठी आज लोकसहभागाची आवश्यकता आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना शौचालय बांधून दिले जातात. निर्मलग्राम योजना असताना अनेक गावे स्वच्छ झाली, तेथे शौचालयांची निर्मिती झाली. परंतु आता अनेक गावांत स्वच्छतेचा अभाव आहे. शौचालये वापरण्यास योग्य नाहीत. तेव्हा आता त्या लाभार्थ्यांनासुद्धा शौचालय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.लोकप्रतिनिधींनीसुद्धा गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून मेंढे म्हणाल्या, शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीसुद्धा या अभियानात मनापासून सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.आ. रहांगडाले म्हणाले, ज्या घरी शौचालय नाही, त्या कुटुंब प्रमुखाने स्वच्छतेचा संकल्प करून शौचालय बांधावे. स्वच्छतेमुळे समृद्धी येण्यास मदत होते. प्रत्येकाने संकल्प केला तर जिल्हा स्वच्छतेतून समृद्धीकडे निश्चित जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, स्वच्छतेच्या बाबतीत एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. २४ जानेवारीला संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या यशस्वितेत लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत वातावरण निर्मिती आहे. मात्र शहरी भागात वातावरण निर्मिती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वार्ड स्वच्छतेसाठी स्वाक्षरी मोहीम राबविणार असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, स्वयंसेवकांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवून माझा वार्ड स्वच्छ करण्यास तयार असल्याचे लिहून घेण्यात येईल. प्लास्टिक कचरा नष्ट होत नसल्यामुळे तो एकत्र करावा. तालुका पातळीवर गटविकास अधिकाऱ्याने सरपंच व सचिवांच्या सभा घेवून ‘माझे गाव-माझा जिल्हा हागणदारीमुक्त करू’ याचा संकल्प करून त्याबाबत नियोजन करावे, असेही ते म्हणाले. पाटील म्हणाले, स्वच्छता अभियानात कामाचे हात वाढविणे आवश्यक आहे. युवक, महिला, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तसेच प्रसार माध्यमांची भूमिकासुद्धा स्वच्छ भारत अभियानात महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सभेला विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी, देवरी, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव व गोरेगाव येथील नगर पंचायतचे अध्यक्ष तसेच सेवाभावी संस्थेचे पुरूषोत्तम मोदी, धर्मिष्ठा सेंगर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. आभार लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)