शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेला अभिप्रेत शेवटच्या घटकालाही न्याय देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:06 IST

भारतीय राज्य घटनेने मूलभूत अधिकार दिलेत. ते मूलभूत अधिकार नागरिकांना मिळत नसतील तर लोकशाहीला अर्थ राहत नाही.

ठळक मुद्देभूषण गवई यांचे प्रतिपादन : जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन

ऑनलाईन लोकमतगोंदिया : भारतीय राज्य घटनेने मूलभूत अधिकार दिलेत. ते मूलभूत अधिकार नागरिकांना मिळत नसतील तर लोकशाहीला अर्थ राहत नाही. हक्क मिळवून देण्यासाठी नागरिकांना न्यायपालिकेकडे धाव घ्यावी लागते. त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी न्यायपालीका महत्वाची भूमिका बजावते. भारतीय राज्य घटनेला अभिप्रेत असलेल्या समाजातील शेवटच्या घटकालाही न्याय देण्याचे काम आम्ही करु असे प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीत नूतन इमारतीच्या कोनशीला समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर, जिल्हा सत्र न्यायाधीश शरद त्रिवेदी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टेकचंद कटरे उपस्थित होते.पुढे बोलताना न्या. गवई यांनी, देशात हिंदूंसाठी गीता, मुसलमानांसाठी कुराण, ेिख्रश्चनसाठी बायबल महत्वाचा ग्रंथ असतो तसेच भारतीयांसाठी भारतीय राज्यघटना महत्वाची आहे. राजापेक्षा ही कायदा पुढे असून कायद्यापुढे सर्व समान आहे. भारताची राज्यघटना समानतेवर आधारीत आहे. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे राज्यघटनेने आम्हा भारतीयांना दिलेले असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी न्या. गिरटकर यांनी, गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात पाच हजार २११ दिवाणी प्रकरणे तर १३ हजार ९१५ फौजदारी असे एकूण १९ हजार १२६ प्रकरण प्रलंबीत आहेत. प्रलंबीत खटल्यांचा निपटारा करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. नवीन इमारतीत सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष, उत्तम फर्निचर राहणार असून सर्व सोई सुविधांनी नटलेली ही इमारत असेल असे सांगीतले.प्रास्ताविक प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कोठेकर यांनी मांडले. संचालन अ‍ॅड. ओम मेठी व न्यायाधीश ढोके यांनी केले.कार्यक्रमाला चंद्रपूर येथील न्यायाधीश बोरकर, मुंबई येथील न्यायाधीश चांदेकर, जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश माधुरी आनंद व इतर न्यायाधीशांसह जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील वकील उपस्थित होते.कार्यक्रमासाठी अ‍ॅड. वसंत चुटे, अ‍ॅड. पुरुषोत्तम आगाशे, अ‍ॅड. सुनिता पिंचा, अ‍ॅड. कृष्णा पारधी, अ‍ॅड. सचिन बंसोड, अ‍ॅड. प्रकाश तोलानी व इतरांनी सहकार्य केले.