शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणवठे पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:11 IST

यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे.

ठळक मुद्देवन्यप्राण्याचा उष्माघाताने मृत्यू : वन्यजीव विभागाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. तर वाढते तापमान आणि पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण पहाडी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला.तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीे टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात घट होत आहे.त्यामुळेच जंगलातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घेण्याची वेळ आली असून पाण्याअभावी व उष्णतेच्या दाहकतेमुळे रानगव्यासारख्या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. यामुळे वन आणि वन्यजीव विभागाच्या उपाय योजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २५६ पाणवठे असून त्यापैकी ७८ नैसिर्गक स्त्रोताचे तर १५४ कृत्रिम पाणवठे आहेत. २४ तलाव ही या क्षेत्रात आहे. १५४ कृत्रीम पाणवठ्यात पाणी पुरवठा व्हावा यासाठी १४१ हातपंप तयार केलेले आहेत. त्यापैकी ११० हातपंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत.१३ पाणवठ्यात तीन टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय केली जात आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागाचे म्हणने आहे. तर वन्यप्रेमीनी आठ दिवसांपूर्वी जंगलातील कुठल्याच पाण्याची सोय करण्यात नसल्याचा आरोप केला आहे.काही निसर्ग प्रेमी संस्थानी यावर आवाज उठविल्यानंतर वन्यजीव विभागाने टँकर लावून पाण्याची सोय केल्याची माहिती आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :forest departmentवनविभाग