शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेत पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:52 IST

गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी पुजारीटोली प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अखेर तालुक्यात दाखल झाले आहे. तालुक्यातील ग्राम तेढवा येथील नाल्याच्या बंधाऱ्यात हे पाणी अडले होते. मात्र हा बंधारा भरल्यानंतर हे पाणी पुढे जावून सोमवारी (दि.२२) सायंकाळी वैनगंगेला जावून मिळाले. त्यामुळे आता शहरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

ठळक मुद्देसोमवारी सायंकाळी एंट्री : शहरातील पाण्याचा प्रश्न सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी पुजारीटोली प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अखेर तालुक्यात दाखल झाले आहे. तालुक्यातील ग्राम तेढवा येथील नाल्याच्या बंधाऱ्यात हे पाणी अडले होते. मात्र हा बंधारा भरल्यानंतर हे पाणी पुढे जावून सोमवारी (दि.२२) सायंकाळी वैनगंगेला जावून मिळाले. त्यामुळे आता शहरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठी उरला असून त्यातून एक-दोन दिवसच शहराला पाणी पुरवठा करता येईल. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पुजारीटोलाच्या पाण्याची मागणी केली व गुरूवारी (दि.१८) दुपारी ३ वाजतादरम्यान पाणी तेथून सोडण्यात आले.९० किमी. चा हा प्रवास करीत पुजारीटोलाचे पाणी अखेर गोंदिया तालुक्यातील ग्राम तेढवा येथील नाल्यात पोहचले आहे. सोमवारी (दि.२२) सकाळीच पाणी नाल्यात पोहचले होते. मात्र या नाल्यातील बंधाऱ्यात पाणी अडून होते. हा बंधारा भरल्यानंतर पाणी पुढे निघणार होते व सायंकाळी बंधारा भरल्यानंतर पुजारीटोलाचे पाणी अखेर वैनगंगेच्या पात्रात शिरले.पाणी तोंडावर येवून अडकून बसल्याने अधिकारीही हैरान झाले होते. मात्र सांयकाळी पुन्हा पाण्याने पुढचा प्रवास सुरू केला. अखेर सोमवारी सायंकाळी पाण्याचा हा प्रवास वैनगंगेत जावून संपला.