शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पाणपोईचा धर्म झाला बाटलीबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:35 IST

तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजागोजागी दिसणाऱ्या पाणपोई लुप्त । पाणीविक्रीचा धंदा फोफावला

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.तहानलेल्यास घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाºया सामाजिक संस्था व संघटना सामाजिक भान जपत दरवर्षी उन्हाळ्यात वाटसरुंसाठी पाणपोई सुरू करीत होते.या सामाजिक कार्यासाठी पाच-सहा वर्षापूर्वी बरेच हात पुढे येत. मात्र आजघडीला या सामाजिक कार्यासाठी अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सेवाभाव या वृत्तीने ग्रामीण भागात बसस्थानकासह वर्दळीच्या ठिकाणी किंवा आपल्या घर व दुकानासमोर पाणपोई उभारतात.या ठिकाणी रस्त्यावरुन जाणारी व्यक्ती आपसुकच पाणपोई दिसली की, क्षणभर विश्रांती घेऊन दोन घोट पाणी पिऊन नंतर पुढच्या मार्गाने प्रवासाला जायचे. काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात हे चित्र बहुतांश ठिकाणी दिसायचे. परंतु कालौघात ग्रामीण व शहरी भागात पाणी पाजणे या पुण्याच्या कामाला अखेरची घरघर लागली आहे.गोरेगावात प्याऊचे उद्घाटननिसर्ग मंडळाने नागरिकांसाठी मुख्य चौकाच्या बाजूला प्याऊची व्यवस्था केली आहे. मंगळवारी (दि.२८) या प्याऊचे उद्घाटन करून नागरिकांसाठी प्याऊ सुरू करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, महेश कटरे, डॉ. लोकेश तुरकर, टिटू जैन, शेखर रहांगडाले, पुरुषोत्तम बोपचे, गुड्डू ठाकूर, जगदिश पटले, किशोर भगत, सुरेश कटरे, रंजीत हरिणखेडे उपस्थित होते.लहान मोठ्या कार्यातही विकतचे पाणीतहानलेल्यांची तहान भागविणे हे पुण्याचे काम समजले जाते व पाणी विकणे हा अपराध समजला जायचा. परंतु काळ बदलला, आता ग्रामीण भागासह शहरी भागापर्यंत पाणी विकण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाटर फिल्टर उभे राहिले. कॅनच्या पाण्याची अलीकडे फॅशन झाली, अनेक ठिकाणी लहानमोठ्या कार्यातही कॅनचा वापर केला जात आहे.हॉटेलच्या पाण्यावर भिस्तआजघडीला पानपोईचे पाणी पिने नागरिकांना कमीपणाचे वाटत आहे. त्यामुळे अनेक जन हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खात हॉटेलच्या पाण्यावर तहान भागवितात. एकीकडे हॉटेलातील गरम पाण्याने तहान भागत नाही तर दुसरीकडे बाटलीबंद पाण्याशिवाय उपाय नाही. 

टॅग्स :Waterपाणी