शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीचा पाणीपुरवठा होणार बंद

By admin | Updated: January 12, 2016 01:35 IST

सेंदुरवाफा व साकोली या दोन्ही गावांची पाणी पुरवठा करणारी योजना आता कायमस्वरुपी बंद होणार आहे.

जलकुंभाची साठवण क्षमता कालबाह्य : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पत्रसंजय साठवणे साकोलीसेंदुरवाफा व साकोली या दोन्ही गावांची पाणी पुरवठा करणारी योजना आता कायमस्वरुपी बंद होणार आहे. त्यामुळे साकोली व सेंदुरवाफा येथे ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. येत्या १५ जानेवारीपासून साकोलीचा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे पत्र ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी नगर पंचायत साकोलीला दिले आहे. त्यामुळे साकोलीवासियांच्या समस्येत भर पडणार आहे.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग साकोलीतर्फे साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावाना पाणी पुरवठा करण्यात येत होता. यासाठी एम. बी. पटेल महाविद्यालय साकोलीच्या मागे असलेल्या टेकडीवर पाण्याचे जलकुंभ तयार करण्यात आले होते. उर्वरित साकोली येथील काही वार्डासाठी लाखांदुर मार्गावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या बाजुलाच एक पाण्याचे जलकुंभ आहे. या दोन्ही टाकीतुन साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र सात-आठ वर्षाआधी महामार्ग चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. या कामादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सेंदुरवाफा येथे जाणारी पाईपलाईन निकामी झाली तेव्हापासुन सेंदुरवाफा येथील पाणीपुरवठा बंद आहे.साकोली येथील कॉलेजच्या मागील बाजुला असलेली पाईपलाईन ठिकठिकाणी बुझल्यामुळे व लोकांची घरे झाल्यामुळे बरीच पाईप लाईन निकामी झाली परिणामी टेकडीवरील टाकीत पाणी आणावे बंद झाले त्यामुळे साकोली येथील फक्त तलाव व गणेशवॉर्ड या दोन वॉर्डातील पाणीपुरवठा या विभागामार्फत सुरु होता. मात्र सदर योजनेची पाईप लाईन व पाण्याची टाकी जीर्ण झाली त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने ३० आॅक्टोंबर २०१५ रोजी डॉ. एस. एस. कुलकर्णी (नागपुर) यांनी साकोली सेंदुरवाफा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत या जलकुंभाचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणानुसार सदर जलकुंभाला ४० वर्ष पुर्ण झाली असून टाकीला ‘लिकेजेस’ असल्याचे पाहणीनंतर दिसून आले. त्यामुळे सदर टाकी वापरण्यात येऊ नये व जलकुंभ लवकरात लवकर जमीनदोस्त करण्यात यावे असे सुचविले आहे. या अहवालावरुन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी येत्या १५ तारखेपासुन साकोलीचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. या आशयाचे पत्र नगर पंचायत प्रशासक साकोली यांना दिले व पुढे पाण्याची सोय करावयाची असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांचेशी संपर्क साधावे असेही नमुद करण्यात आले आहे.त्यामुळे ऐन मकर संक्रातीला सणासुदीच्या दिवसातच साकोलीचा पाणी पुरवठा बंद होणार असल्याने सणाच्या आनंदोत्सवात विजण पडेल यात शंका नाही.