शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मागील ८ दिवसांपासून तिरोडा शहराचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:54 IST

बिरसी फाटा : तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणीपुरवठा होत असून, मागील ८ दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून ...

बिरसी फाटा : तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणीपुरवठा होत असून, मागील ८ दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाणीपुरवठा होत नसल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा जवळपास बंद आहे. पाण्याअभावी नागरिक बेजार झाले असून, नगर परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याची कुठलीही सूचना देण्यात न आल्याने नागरिक नाराज आहेत. ही अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून २ दिवसांत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे वर्तविली जात आहे.

तिरोडा शहरातील अंदाजे ३५०० न‌ळधारकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वैनगगा नदीवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. धापेवाडा उपसा सिंचन योजनेने धरणाची दारे बंद केल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस पुरवठा होत नसल्याने तिरोडा शहराचा पाणीपुरवठा मागील ८ दिवसांपासून बंद आहे. असे असतानाही शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याची कोणतीही सूचना नगर परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सुनील भांडारकर यांना विचारणा केला असता त्यांनी, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे धरणाचे दार बंद केल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस पाणीपुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाचे झिरपणारे पाणी विहिरीपर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू असून २ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. याकरिता प्राधिकरण व धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज होती, असे तिरोडा शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे.