शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:07 IST

गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपूर्ती करण्याचे आमचे लक्ष्य होते. याकरिता ५६ लाखांच्या खर्चाची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येत आहे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ५६ लाखांच्या योजनेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपूर्ती करण्याचे आमचे लक्ष्य होते. याकरिता ५६ लाखांच्या खर्चाची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येत आहे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.ग्राम चंगेरा येथे ५६ लाख रुपये किमतीची पाणी पुरवठा योजना, ६ लाख रुपये किमतीचे सभामंडप व ३ लाख रुपये किमतीच्या मरघट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सभापती रमेश अंबुले, जि.प. सभापती लता दोनोडे, उपसभापती चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, पं.स.सदस्य अनिल मते, देवेंद्र मानकर, लोकचंद दांदरे, राधेश्याम देवाधारी, तेजन बोरकर, पुष्पा ब्रम्हे, साहेब बोरकर, पुष्पा मरस्कोल्हे, आतिष रफिक खान, हमीद खान, गुड्डू खान, जयकुमार डहाट, मन्नुसार बोरकर, भाऊलाल बोरकर, चमरु डहाट, उपदेश डहाट, अनिमल डहाट, शिवशंकर गुप्ता, अनंतराम कोडवती, लालसिंग पंधरे, रामसिंग मरकाम, जयसिंग मरकाम, रफीक खान, आरीफ खान, हमीद दाऊद खान, इदरिस खान, चंदन बिजेवार, राधेलाल हिरवानी, विक्की नागवंशी, कैलास बोरकर, बाबू खान, धनीराम बिजेवार, प्रमेश बनकर व गावकरी उपस्थित होते.आ. अग्रवाल पुढे म्हणाले, चंगेरा ग्राम मुस्लीमबहुल आहे. गेल्या काही वर्षात येथे मजारच्या समोर सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले. ते आता मांगलिक कार्याकरिता उपयोगी पडत आहेत. चंगेराकडून जाणारे चंगेरा-कोचेवाही, चंगेरा-बाजारटोला तसेच गोंदिया-बालाघाट या सर्व मार्गांच्या नूतनीकरण कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. रजेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेमुळे आरोग्य सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, कोचेवाही-परसवाडा मार्गावर नवीन पूल निर्माणची गोष्ट असो वा बनाथर-कोचवाही-चंगेरा मार्गाचे नवीनीकरण असो, आमदार अग्रवाल विकास कामे खेचून आणतात. त्यामुळेच परिसरातील विकास कामांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.सरपंच, उपसरपंच यांचा काँग्रेस प्रवेशया वेळी आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चंगेराच्या सरपंच कांता डहाट व उपसरपंच आबीद खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार अग्रवाल यांनी सर्व अतिथींचे तसेच सरपंच कांता डहाट व उपसरपंच आबीद खान यांचे पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल