शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

येत्या १५ दिवसांत सुरू होणार पाणी पुरवठा

By admin | Updated: June 19, 2014 23:54 IST

शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सिव्हील लाईंस पाणी टाकीतून येत्या १५ दिवसांत पाणी पुरवठा सुरू करण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे नियोजन आहे.

सिव्हिल लाईनची टाकी सज्ज : सुरू आहे पाईपलाईनची चाचणीगोंदिया : शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सिव्हील लाईंस पाणी टाकीतून येत्या १५ दिवसांत पाणी पुरवठा सुरू करण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे नियोजन आहे. सुमारे २१ लाख ३५ हजार लीटर क्षमता असलेल्या या टाकीतून सिव्हील लाईनसह लगतच्या परिसराला पाणी पुरवठा केला जाणार आहे. या टाकीच्या क्षेत्रात येणाऱ्यांना १५ दिवसांनतरच नळ कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठा व्हावा या उद्देशातून शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना शहराला दिली. या योजनेंतर्गत शहरातील सिव्हील लाईंस, सुर्याटोला व भिमनगर परिसरात पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले. सिव्हील लाईंस स्थित पाणी टाकी ही सर्वाधीक क्षमतेची टाकी असून तिची क्षमता २१ लाख ३५ हजार लीटर आहे. विवेकानंद कॉलनीत या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या टाकीत पाणी भरून पाईप लाईन मधील लिकेज टेस्टींगचे काम सुरू आहे. या टाकीतून शहरातील पोस्ट आॅफीस, जिल्हाधिकाऱ्यांचा जुना बंगला, हनुमान मंदीर, इंगळे चौक, बोडी, नुरी चौक, शितला माता मंदीर, जयपुरिया हॉस्पीटल, केमीस्ट भवन, साई मंदिर, मामा चौक, पी.ए.राईस मील, पंचायत समिती कॉलनी, विवेकानंद कॉलनी आदी परिसरात पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या पाईप लाईनचे कामही पूर्णत्वावर आहे. एकंदर सर्व कामे पूर्ण झाली असून पाईप लाईनच्या टेस्टींगचे काम सुद्धा येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून पाईप लाईन साफ केल्यानंतर येत्या १५ दिवसांत टाकी पाणी पुरवठ्यासाठी सज्ज होणार असल्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या अंदाज आहे. त्यामुळेच येत्या १५ दिवसांत या टाकीतून पाणी पुरवठा सुरू करण्याच्या तयारीत सध्या विभागाचे अधिकारी लागले आहेत. तर या टाकीच्या क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना या टाकीचे नळ कनेक्शन देण्यासाठी सुद्धा सोबतच सुरूवात केली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्या असलेली जुनी पाईप लाईन बंद केली जाणार आहे. तर ज्यांच्याकडे काही थकीत नाही त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देऊन विभागाच्या काही प्रक्रिया पूर्ण करून कनेक्शन दिले जाणार आहे. तसेच नवीन कनेक्शनसाठी ठरविण्यात आलेली रक्कम भरून व विभागीय प्रक्रिया पूर्ण करून कनेक्शन दिले जाणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)