शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाई: उपाय योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:00 IST

मार्च महिन्याला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील नागरिक पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत आहे. जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर तोडगा काढणे अपेक्षीत असताना ते मात्र अद्यापही कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त आहे.

ठळक मुद्दे७२ लाखांच्या निधीची प्रतीक्षा : बोअरवेल पाईप खरेदी रखडली, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतगोंदिया : मार्च महिन्याला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील नागरिक पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत आहे. जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर तोडगा काढणे अपेक्षीत असताना ते मात्र अद्यापही कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासूनच भटकंती करण्याची पाळी आली आहे.जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या केवळ ५३ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. जिल्ह्याची भूजल पातळी सुध्दा २ मीटरने खालावली असून बोअरवेल व विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे मागील महिन्यापासून गोरेगाव, तिरोडा, सडक-अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सुध्दा यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तविली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने यावर त्वरीत उपाय योजना करण्याची गजर होती. मात्र प्रशासनाने पाणी टंचाईचा मुद्दा अद्यापही गांर्भियाने घेतला नसल्याने गावकºयांचे मात्र हाल होत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मागील सहा महिन्यापासून बोअरवेलचे पाईप आणि इतर सुट्या सामनाची टंचाई आहे. या सामानाची खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे या विभागाचे अधिकारीच सांगतात. जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी हा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सातत्याने लावून धरला होता. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीतून यासाठी निधी देण्यात आला. मात्र यानंतर स्थायी समितीची प्रोसीडींग कॉपी तयार न झाल्याने लेखा विभागाने हा निधी देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. सभा होवून पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही सभेची अवतरण प्रत तयार केली जात नाही.ही जिल्हा परिषदेसाठी चिंतेची बाब आहे. त्यानंतर अहवाल तयार झाला तर जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांनी सर्व खंडविकास अधिकाऱ्यांना त्यांना किती बोअरवेलचे पाईप आणि साहित्याची गरज आहे याचा अहवाल मागविला. हा अहवाल आल्यानंतरच पाणी टंचाई निवारणार्थ निधी देण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. अद्यापही काही खंडविकास अधिकाºयांनी अहवाल पाठविला नसल्याची माहिती आहे.त्यामुळे निधी उपलब्ध असून देखील त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यापासून पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना केवळ कागदावरच सुरू असल्याचे चित्र आहे.पालकमंत्र्यांचे निर्देश धाब्यावरमहिनाभरापूर्वीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना त्वरीत राबविण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे सांगितले होते. मात्र पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतरही जिल्हा परिषदेकडून उपाय योजना करण्यास दिंरगाई केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी पालकमंत्र्यांचे निर्देश सुध्दा जुमानत नसल्याचे चित्र आहे.बैठकीत चर्चा कशावरजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दर तीन चार दिवसांनी खंडविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाºयांची बैठक बोलवितात. मात्र त्यात पाणी टंचाई सारख्या गंभीर विषयावर चर्चा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. जर बैठकीत पाणी टंचाईवर चर्चा झाली असती तर सीईओंना यासंबंधीचा अहवाल परत मागविण्याची वेळ आली नसती असे बोलले जाते.