शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६२ गावे जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:01 IST

राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत वाढ

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी या गावांत आता जलयुक्त शिवारच्या कामाची गरज नाही.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २१५-१६ वर्षात ९४ गावे, २०१६-१७ मध्ये ७७ गावे, व २०१७-१८ या वर्षात ६३ गावांची निवड करण्यात आली होती.या अभियानाच्या पहिल्या टप्यात ९४ गावे, दुसऱ्या टप्यात ७७ गावे वॉटर न्यूट्रल झाल्यानंतर तिसºया टप्यात ६३ गावांपैकी ६२ गावे शंभर टक्के तर एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाले आहे.सन २०१७-१८ निवड झालेल्या गावांत गोरेगाव, गोंदिया, तिरोडा या तालुक्यातील प्रत्येकी १० गावे, आमगाव व सडक अर्जुनी प्रत्येकी ६ गावे, देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील प्रत्येकी सात गावांची निवड करण्यात आली होती. ही सर्व गावे शंभरटक्के वॉटर न्यूट्रल झाली आहेत.केवळ सालेकसा तालुक्यातील एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाला आहे. सन २०१७-१८ मध्ये अभियानांतर्गत १९९१ कामांना मंजूरी देण्यात आली होती. यात कृषी विभाग १४३८, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ तर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले. १३५९ कामे सुरू करण्यात आले. निवड झालेली सर्व गावांत जलयुक्त शिवार कामांमुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.यावर्षीची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार