अवर्षण : आतापर्यंत ६० टक्के धरणे भरणे गरजेचे होतेगोंदिया : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस पडला आहे. आता पर्यंत ६० टक्के धरणे भरायला हवी होती. परंतु या धरणात आतापर्यंत २० टक्के पाणी नवीन जमा झाले नाही. जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या धरणांची माहिती घेतली असता मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी अत्यल्प आहे. बोदलकसा मध्यम प्रकल्पात यावर्षी १.६९८ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. मागच्या वर्षी आजच्या तारखेत २.३९२ दलघमी होते. चोरखमारा यावर्षी ०.४३७ दलघमी तर मागच्या वर्षी आजच्या तारखेत ३.८१२ दलघमी, चुलबंद यावर्षी ३.८३३ दलघमी तर मागच्या वर्षी आजच्या तारखेत ५.४०३ दलघमी, खैरबंदा यावर्षी १.८१५ दलघमी तर मागच्या वर्षी आजच्या तारखेत २.०४७ दलघमी, मानागड यावर्षी १.०७७ दलघमी तर मागच्या वर्षी आजच्या तारखेत ०.५५५ दलघमी, रेंगेपार यावर्षी ०.०५० दलघमी तर मागच्या वर्षी आजच्या तारखेत ०.५५७ दलघमी, संग्रामपूर यावर्षी ०.४४३ दलघमी तर मागच्या वर्षी आजच्या तारखेत ०.३५६ दलघमी एवढे होते. यावर्षी मध्यम प्रकल्पांमध्ये १०.९२ टक्के पाणी आहे. तर मागच्या वर्षी १६.९६ टक्के पाणी होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६ टक्के पाणी कमी आहे. मोठ्या धरणांची हीच स्थिती आहे. परंतु मागच्या वर्षी उशीरा आलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा साठा आहे. मागच्या वर्षी उशीरा पाऊस आला होता. इटीयाडोह धरणात यावर्षी ८२.८४ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हे धरण फक्त १३.४० टक्के भरले आहे. मागच्या वर्षी ४४.९४ दशलक्ष घनमीटर पाणी साठा पाणी होता. शिरपूर धरणात यावर्षी २३.६४ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हे धरण फक्त १४.८० टक्के भरले आहे. मागच्या वर्षी ५३.०८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा पाणी होता. पुजारीटोला धरणात यावर्षी ७.५२ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हे धरण फक्त १७.२८ टक्के भरले आहे. मागच्या वर्षी ००.०० दलघमी होते. कालीसरार धरणात यावर्षी ३.३० दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हे धरण फक्त ११.९१ टक्के भरले आहे. मागच्या वर्षी ००.०० दलघमी होता. १५ जुलैपर्यंत धरणांमध्ये ६० टक्के धरणात पाण्याचा साठा असायला हवा. परंतु यावर्षी धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. (तालुका प्रतिनिधी)
धरणांत पाण्याचा ठणठणाट
By admin | Updated: July 15, 2015 02:10 IST