शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जलयुक्त शिवार योजना आराखडा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:53 IST

जलयुक्त शिवार योजना २०१८-१९ साठी निवड झालेल्या तालुक्यातील गावात करावयाच्या जलसंधारण कामांचे नियोजन करण्यासंबंधाने तालुकास्तरीय जलयुक्त शिवार योजना समितीची बैठक नुकतीच पंचायत समिती बचत भवनात घेण्यात आली.

ठळक मुद्देकामांचा आराखडा तयार केला : १६ गावांसाठी २७७ कामे प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जलयुक्त शिवार योजना २०१८-१९ साठी निवड झालेल्या तालुक्यातील गावात करावयाच्या जलसंधारण कामांचे नियोजन करण्यासंबंधाने तालुकास्तरीय जलयुक्त शिवार योजना समितीची बैठक नुकतीच पंचायत समिती बचत भवनात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती करुणा नांदगावे, पंचायत समिती सदस्य रामलाल मुंगणकर, तालुका जलयुक्त शिवार समिती सचिव तथा तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, सहायक खंड विकास अधिकारी मयुर आंदेलवाड, लपाजिपचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुभाष घरतकर, वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेत यावर्षी अरततोंडी, इंजोरी, निलज, धाबेटेकडी (आदर्श), चापटी, तिडका (करड), देऊळगाव (बोदरा), पांढरवानी (रैय्यत), सिरेगावबांध, भुरसीटोला, संजयनगर, सुकळी, सोमलपूर, चान्ना, चुटिया, कोहलगाव या १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे.सदर गावामध्ये शासनाच्या विविध यंत्रणामार्फत जलसं:धारणाची कामे मोठ्या प्रमाणात करुन गावातील तळे, बोड्या, बंधाऱ्यामधील पाण्याची सिंचन क्षमता वाढविण्यात प्रयत्न केला जाणार आहे. निवड झालेल्या गावांमध्ये कोणती कामे करायची, आराखडा बनवून प्रस्तावित कामे करण्यासाठी स्थानिक गावचे सरपंच, पदाधिकारी यांना या बैठकीत खास निमंत्रित करण्यात आले होते. तसेच ग्रामसेवक, विविध शासकीय यंत्रणाचे अधिकारी, कर्मचारी, मग्रारोहयो पं.स.चे सहायक कार्यक्रम अधिकारी, अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, गोठणगावचे वनपरिक्षेत्राधिकारी, लपाजिपचे शाखा व कनिष्ठ अभियंता, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, जलसंधारण विभाग देवरीचे कनिष्ठ अभियंता खोकले तसेच पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. सभेत निवड झालेल्या गावातील पदाधिकाºयांनी विविध कामे सुचविली. बैठकीत सर्वांच्या समन्वयातून गावाच्या परिस्थितीनुरुप कामाचा आराखडा तयार करण्यात आला. १६ गावांसाठी २७७ कामे प्रस्तावित करण्यात आली. याप्रसंगी शिवणकर यांनी, जलयुक्त शिवार योजना गावातील शेतकºयांसाठी एक वरदान आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे एका पाण्यासाठी धान पिकाच्या उत्पादनापासून वंचित रहावे लागले. जलयुक्त शिवाराच्या जलसंधारणाच्या विविध कामामुळे जलसिंचन साठ्यात वाढ होवून संरक्षित पाण्यात वाढ होते. जलसाठा वाढल्याने पिकांच्या उत्पादनासोबत गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार