शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:09 IST

भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई व दुष्काळ दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे .....

ठळक मुद्देअभिमन्यू काळे : गावपातळीवरील प्रतिनिधींचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भविष्यात निर्माण होणारी पाण्याची टंचाई व दुष्काळ दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्राम हिवरा येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत तीन दिवसीय गावपातळीवरील प्रतिनिधींचे प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रशिक्षणाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, प्रशिक्षक म्हणून इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, कृषी सहायक डी.के.ठाकूर, कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. सविता पवार, महेंद्र मेश्राम, तालुका कृषी अधिकारी निरज जागरे, नाबार्डचे सहायक व्यवस्थापक मनोहर वाकडे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी काळे यांनी, जलयुक्त शिवार अभियानाची माहिती गावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी जलयुक्त शिवार अभियानाची गरज आणि वैशिष्ट्ये, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विविध समित्यांची रचना व कार्यपध्दती, क्षेत्रीय उपचाराची माहिती, पाण्याचे अंदाजपत्रक, जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गावाचा आराखडा तयार करणे, जल व्यवस्थापन व तयार मतांची देखभाल दुरुस्ती व हस्तांतरण अश्या विविध विषयावर मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणाला गोंदिया तालुक्यांतर्गत १० गावातील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड झालेल्या गावातील सरपंच, महिला प्रतिनिधी, उपसरपंच, ग्राम कार्यकर्ता, प्रगतीशील शेतकरी, ग्रामसेवक, कृषी सहायक, कृषी मित्र व ग्रामसेवक उपस्थित होते. या तीन दिवसीय प्रशिक्षणादरम्यान क्षेत्रभेट दाखविण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी मार्गदर्शक पुस्तीका व प्रमाणपत्र देण्यात आले.संचालन ज्ञानेश्वर पटले यांनी केले. आभार गजेंद्र मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजा पटले, पूर्णप्रकाश कुथेकर, विशाल मेश्राम, गौतम बोरकर व कर्मचाºयांनी सहकार्य केले.