शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर फिल्टर प्लान्ट अखेर कायमचा बंद

By admin | Updated: February 5, 2017 00:18 IST

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या माध्यमातून सौंदड येथील ७ हजार लोकांना शुध्द व फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी

नियोजनाचा अभाव: सात हजार नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित सौंदड : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या माध्यमातून सौंदड येथील ७ हजार लोकांना शुध्द व फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी पिण्याकरीता मिळत होते.परंतु नियोजनाअभावी फिल्टरचे पाणी मिळणे कायमचे बंद झाले आहे. सौंदड हे गाव उत्तर ते दक्षीण जवळपास दोन किमी इतक्या अंतरात आहे.या गावासाठी २००१ मध्ये वॉटर फिल्टर ही योजना सुरू करण्यात आली. २००१ मध्ये सुरू झालेली ही योजना काही काळ सुरू राहीली. सौंदड या गावामध्ये एकूण पाच वार्ड आहेत. प्रत्येक नागरिकाना पिण्याचे पाणी प्राप्त व्हावे याकरीता पाईप लाईन ग्राम पंचायतच्या माध्यमातून २० वर्षा अगोदर टाकण्यात आली आहे. मात्र ती पाईप लाईन २० वर्षापासून अजनूही स्वच्छ केली नाही. नळामध्ये पॉलीथीन कचरा, गढूळ पाणी येते. पिण्याचे पाणी स्वच्छ व शुध्द पिण्या योग्य पाणी मिळावे अशी नागरिकांची इच्छा आहे. ग्राम पंचायतीद्वारे नागरिकांना पिण्याकरीता पाणी चुलबंद नदी पात्रातून विज पंपाद्वारे पाणी टाकी मध्ये सोडले जाते. अशुध्द व क्षारयुक्त पाणी पाईप लाईनमध्ये टाकले याते. यामुळे नागरिक वेळोवेळी आजारी पडतात. कित्येक वेळी विजेचे बील न भरल्यान पाणी पंपाची वीज कापली जाते. परिणामी नागरिकांना आठवडाभर पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्यासाठी नागरिकाना भटकंती करावी लागते. पाण्याचा योग्य पुरवठा होत नसल्याने नागरिक कित्येकदा नळ बिल भरत नाही. याला जबाबदार स्वत: प्रशासन आहे. सौंदड गावातील जनतेला वेळीच पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे याकरीता अतिरीक्त पाणी टाकी निर्माण करण्यात आली. या वॉटर फिल्टर प्लांटद्वारे पाणी भंडारा जिल्ह्यातील निम्म चुलबंद जलाशयाच्या आतील भागात लवारी येथे (विहीर) तयार करून तब्बल लवारी उमरी ते सौंदड १० किमी पाईप लाईन तयार करुन तेथील पाणी सौंदड येथे पिण्याकरीता आणले जाते. मात्र काही काळापासून या योजनेवर लक्ष न ठेवल्यामुळे संपूर्ण फिल्टर प्लांट पाईप लाईन नादुरूस्त असल्याने बंद आहे. शुध्द पाण्यापासून संपूर्ण गाव वंचीत आहे. याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीने पक्षपात व हेवेदावे न करता गावातील जनतेच्या विकासाकरीता त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे. सौंदड या गावात एकमेव वॉटर फिल्टर बसविण्यात आला होता. परंतु तेही आता धूळखात पडले आहे. महाराष्ट्र शासन पिण्याच्या पाण्यासाठी व देखभाल दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी टंचाई आराखडा तयार करीत असते. यामध्ये ही योजना बसवून ही योजना पुन्हा सुरू करावी जेणेकरून जनतेला शुध्द पाणी पिण्यासाठी मिळेल, अशी मागणी माजी सभापती अशोक लंजे यांनी केली आहे. (वार्ताहर)