शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कुलर मशीन ठेवली भर उन्हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:18 IST

मागील आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पाऱ्याने चाळीस पार केली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालयाचा प्रताप : रूग्णांवर गरम पाणी पिण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून पाऱ्याने चाळीस पार केली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मात्र अशा स्थितीत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची मशिन रुग्णालयाच्या आवारात भर उन्हात ठेवल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना उन्हाचे चटके सहन करीत गरम पाणी प्यावे लागत आहे.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरुन चर्चेत असते. आता हे वैद्यकीय महाविद्यालय उन्हात ठेवलेल्या वॉटर कुलर मशिनवरुन चर्चेत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वॉटर कुलर मशिन लावण्यात आली आहे.मात्र ही मशिन रुग्णालयाच्या इमारतीत लावण्याऐवजी ती बाहेर उघड्यावर लावण्यात आली आहे. त्यामुळे या मशिनचे पाणी थंड होण्याऐवजी गरम होत आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना भर उन्हात उभे राहून पाणी प्यावे लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात वॉटर कुलर मशिन लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. पण, रुग्णालय प्रशासनाने कोणता विचार करुन ही मशिन रुग्णालयाच्या आवारात भर उन्हात ठेवली हे मात्र समजण्या पलिकडे आहे.विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातानी प्रसिध्दी पत्रक काढून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असून काळजी घेण्यासाठी दिवसातून सात ते आठ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनीच काढलेल्या प्रसिध्दी पत्रकाचा त्यानाच विसर पडल्याचे चित्र आहे.यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता यांना विचारणा केली असता रुग्णांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ही वॉटर कुलर मशिन बाहेर लावल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळेस वैद्यकीय महाविद्यालयाच्या दरवाज्याला कुलूप लावले जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस त्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ही मशिन आवारात लावल्याचे सांगितले.टँकरने पाणी पुरवठायेथील शासकीय महाविद्यालयात पाण्याची तीव्र समस्या आहे. बरेचदा येथील रुग्णांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तर मागील काही दिवसांपासून वैद्यकीय महाविद्यालयाला नगर परिषदेच्या टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.विशेष म्हणजे या महाविद्यालयातील विहिरीत दररोज दोन तीन टँकर पाणी सोडले जात आहे. मात्र अद्यापही या समस्येवर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यात आली नाही.पाण्याचा अपव्ययवैद्यकीय महाविद्यालयातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुधारण्यासाठी पाईप टाकण्यात आली. मात्र पाईप लाईनचे पाईप योग्य तºहेने न जोडल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे वैद्यकीय महाविद्यालयातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र दुसरीकडे लिकेज पाईप लाईनमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे.