शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आमगावात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:25 IST

शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती : उपाय योजनेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने आमगाव येथे जलसंकट निर्माण झाले आहे.आमगाव शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना स्थापन करण्यात आली. २.५० लक्ष पाणी टाकीचे व जलवाहिनीचे नविनीकरण करण्यात आले. यात माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी या योजनेला गती दिली. या योजनेत वाढीव पाणी पुरवठा व पाणी टाकीची क्षमतेप्रमाणे वाढ करणे अपेक्षित होते.मात्र त्यासाठी प्रशासनाने कमी प्रमाणात निधी दिल्याने पाणी टाकीच्या क्षमतेत वाढ करणे शक्य झाले नाही.शहराच्या वाढत्या लोकसंख्येला या योजनेव्दारा पाणी पुरवठा शक्य होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहे. त्याचाच परिणाम पाणी पुरवठा योजनेवर झाला आहे. या पाणी टाकीची क्षमता अडीच लाख लिटर क्षमतेची असली तरी प्रत्यक्षात त्यात केवळ १ लाख ५० हजार लिटर पाणी साठविले जात आहे. तर मागील बऱ्याच कालावधीपासून पाणी टाकीची साफसफाई न केल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. पाणी पुरवठ्यासाठी केवळ दोन मोटारपंप लावले असून ते देखील अपूरे पडत आहे.यासर्व गोष्टींमुळे आमगाववासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आमगावला पाणी पुरवठा होणाऱ्या बाघ नदीचे पात्र देखील कोरडे पडल्याने मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. शहरवासीय पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देत असताना स्थानिक प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका बजावित असल्याने नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.भविष्यकालीन उपाय योजनांचा अभावशहरातील वाढती लोकसंख्या लक्षात पाणी पुरवठ्यासह इतर उपाययोजनात वाढ करणे आवश्यक आहे. दरवर्षी आमगाव शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यावरुन नागरिकांची ओरड होते. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाले आहे. दरवर्षी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी पायपीट करतात. लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजसेविका ज्योती खोटेले यांनी सांगितले.