शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांपासून गोदाम भाडे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:34 IST

शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे गोदामे भाड्याने घेतली जाते.

ठळक मुद्देयंदा धान ठेवण्याची अडचण : १२ कोटी रुपये थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे गोदामे भाड्याने घेतली जाते. मात्र गोदाम मालकांना सन २००९ पासून गोदाम भाड्याची रक्कम देण्यास शासनाकडून टाळटाळ केली जात आहे. त्यामुळे यावर्षी खरेदी केलेले धान ठेवण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये. यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्फे शासकीय धान केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राच्या ठिकाणी गोदाम भाडे तत्वावर घेतले जाते. मात्र सरकारने २००९ पासून ते यावर्षीपर्यंतचे गोदाम भाड्याचे जवळपास १२ कोटी रुपये मिळालेले नाही.त्यामुळे गोदाम मालक आर्थिक अडचणीत आले आहे. थकीत गोदाम भाड्याकरिता शासनाकडे वांरवार पाठपुरावा करुन देखील पैसे मिळत नसल्याने यावर्षी धान ठेवण्याकरिता शासनाला गोदाम भाड्याने न देण्याचा निर्णय काही गोदाम मालकांनी घेतल्याची माहिती आहे. ही परिस्थिती केवळ गोंदिया जिल्ह्यातच नसून भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात आहे.यासर्वच जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. गोदाम मालकांची ओरड वाढल्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी शासनाला पत्र लिहून २००९ पासून प्रलबिंत असलेल्या गोदाम भाड्याची रक्कम देण्याची मागणी केली. पण, अद्यापही शासनाकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.आमदार अग्रवाल यांनी घेतली दखलजिल्ह्यातील गोदाम मालकांची समस्या तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अनागोंदी कारभाराची आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दखल घेतली होती. त्यांनी प्रलबिंत गोदाम भाड्याची समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई येथे बैठक घेवून संबंधित विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच ही समस्या त्वरीत मार्गी न लावल्यास कारवाईस तयार राहण्याचा इशारा या विभागाच्या अधिकाºयांना दिली होती.अशी आहे थकीत रक्कमजिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे सन २००९ ते १० आणि २०१४ ते २०१५ या कालावधीतील ६२७ गोदामाचे ३ कोटी ८० लाख रुपये, २०१५-१६ या कालावधीतील ३२५ गोदामाचे १ कोटी ३ लाख आणि गोंदिया शहरातील गोदाम मालकांचे ४ कोटी ८३ लाख रुपये थकीत आहेत.गोदाम मालकांची समस्या लक्षात घेवून यापूर्वीच शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्याकडून योग्य दिशा निर्देश मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल.- अतुल नेरकर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.