शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्डवासीयांची तहान भागविली

By admin | Updated: May 13, 2017 01:32 IST

आठवडाभरापासून वॉर्डांत पेटलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगर पंचायत व महावितरणने

महावितरण व नगर पंचायतचा पुढाकार : बोअरवेलसाठी लगेच वीजजोडणी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आठवडाभरापासून वॉर्डांत पेटलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नगर पंचायत व महावितरणने संयुक्तरीत्या कृती करून वॉर्डातील पाण्याचा प्रश्न सोडविला. नगर पंचायतने दोन बोअरवेलचे खोदकाम केले तर महावितरणने लगेच त्याला वीज जोडणी देऊन पाण्याची समस्या सोडविली. सडक-अर्जुनी येथील हे कार्य असून एकत्र मिळून केलेल्या कामातून सुमारे तीन हजार वॉर्डवासीयांची तहान भागविण्यात यश आले आहे. उन्हाळा म्हटला की पाण्याची समस्या भेडसावते. सडक-अर्जुनी शहरातील वॉर्ड क्रमांक ४ व ६ मध्ये यंदा हीच समस्या उभी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, उमरझरी तलावातील पाणी बंद झाल्याने या वॉर्डात मागील आठवडाभरापासून पाणी टंचाई निर्माण झाली होती. यामुळे वॉर्डांतील सुमारे तीन हजार नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू होती. हा प्रकार महावितरणचे अभियंता राहुल पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ७ मे रोजी नगराध्यक्ष रिता लांजेवार, उपाध्यक्ष महेंद्र मसराम, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष चिट्टेवार यांच्यासह नगर पंचायतमधील समस्त सभापती व सदस्यांची बैठक बोलाविली. या बैठकीत अभियंता पाटील यांनी पाणी टंचाई असलेल्या वॉर्डात नगर पंचायतने बोअरवेल खोदकाम केल्यास त्वरित जोडणी देत पाणी पुरवठा करून पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येणार असल्याचे सांगितले. यावर नगर पंचायतच्या पदाधिकारी व सदस्यांनीही होकार देत नागरिकांची तहान भागविण्यासाठी लगेच कृती करण्याची तयारी दर्शविली. यावर ८ मे रोजी दोन्ही वॉर्डांत नगर पंचायतने बोअरवेलचे लगेच खोदकाम करवून घेतले. तसेच वीज जोडणीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करीत सायंकाळी ५ वाजता अर्ज सादर केला. अभियंता पाटील यांनी अर्ज आल्यावर लगेच वीज मीटरसाठी डिमांड तयार करून दिली. तर नगर पंचायतकडून ९ मे रोजी डिमांड भरण्यात आली असतानाच लगेच मीटर जोडणी करण्यात आली. दोन्ही बोअरवेलला वीज जोडणी मिळाल्याने लगेच पाणी पुरवठा सुरू करून दोन्ही वॉर्डांतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला. नगर पंचायतने प्रश्न गांभीर्याने घेत बोअरवेलचे लगेच खोदकाम करवून दिले. तर महावितरणने काही वेळातच वीज जोडणी दिल्याने तीन हजार वॉर्डवासीयांची तहान भागविण्यात यश आले. अन्यथा पाणी टंचाईने गंभीर रूप घेतले असते. संयुक्त कृतीचे फलीत बहुतांश शासकीय कामकाजात संयुक्त कार्याचा अभाव दिसून येतो. एका विभागाकडून दुसऱ्या विभागावर कामे टोलवली जातात. अशात मात्र जनता किंवा एखादी व्यक्ती कार्यालयाच्या चकरा मारत थकून जाते. येथे मात्र नगर पंचायत व महावितरण या दोन्ही विभागांनी पाणी टंचाईचा प्रश्न गांभीर्याने घेत संयुक्त कृती केली. नगर पंचायतने लगेच बोअरवेल केले नसते तर महावितरणकडून वीज जोडणी देण्याचा प्रश्नच येत नव्हता. मात्र या कार्यातून दोन्ही हात मिळून कार्य करीत असल्यास ते काम नक्कीच फत्ते होते, हे दिसून आले.