शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

मुक्या जनावरांची पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 22, 2017 01:22 IST

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनू लागला आहे. चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर आहे.

 लक्ष्मण सोनवणे। लोकमत न्यूज नेटवर्कबेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनू लागला आहे. सावली नाही, चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर आल्याने दुष्काळ आता त्यांचा वैरी होऊन बसला आहे.तालुक्यात पशुधनाची संख्या जास्त आहे. गायी ४४ हजार २३० आहेत, तर ३० हजार ९१६ म्हशी आहेत. शेळ्या १९,४५०, मेंढ्या ४०, घोडे ५०, कुक्कुट ३९ हजार ५८० आहेत. त्यात शेळ्या, मेंढ्या, म्हशी आदी जनावरे पशुपालकांनी पाळलेली आहेत. या प्राण्यांची तहान भागविण्याची जबाबदारी इगतपुरी तालुक्यातील प्रशासनावर आहे. सध्यातरी मिळेत तिथे पाणी शोधण्यासाठी जनावरे हिंडत आहेत. त्यांचे पोट भरण्यासाठी चारा व पिण्याचे मुबलक पाणी जनावरांना मिळत नसल्याचे भयाण चित्र दिसत आहे. याबरोबरच वन्यप्राण्यांवरदेखील पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनादेखील दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी ठोस पाऊले उचलणे काळाची गरज आहे. तालुक्यात चाराटंचाईमुळे शेतकरी दुचाकीवरून मिळेल त्या ठिकाणावरून चारा विकत आणत आहेत. काही शेतकरी गवत विकत घेतात, तर पैशाअभावी तेही मोजक्या शेतकऱ्यांना घेते येत नाही.प्रत्येक वर्षी निसर्ग बदलत असल्याने उष्णता वाढत आहे. तालुक्यातील तपमान ४० अंश किंवा त्याहून अधिकच आहे. त्या तुलनेत पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. प्रत्येक वर्षी मागील वर्ष चांगले होते असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाला आपली मानसिकता बदलावी लागणार आहे. इगतपुरी तालुक्यात पिण्याचे पाणी व चाराटंचाई यावर चर्चा, बैठका, नियोजन अजूनही झालेले नाही. राजकीय नेते उदासीन आहेत. प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. पाणीबचतीसाठी कठोर धोरण अवलंबवावे लागणार आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर केवळ आता वरवरचे उपाय करून भागणार नाही, तर कायमस्वरूपी एखाद्या योजनेची गरज आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे व तो जमिनीत जिरविण्यासह कूपनलिका खोदून जमिनीची होणारी चाळण थांबवावी लागेल. असे उपाय केल्याशिवाय दुष्काळावर मात करणे शक्य होणार नाही. तालुक्याच्या पूर्व भागात नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मेंढपाळ आलेले आहेत. मेंढ्यांना मुबलक प्रमाणात पाणी नसल्याने तेही हतबल झाले आहेत.