शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

आधारासाठी भटकताहेत निराधार

By admin | Updated: March 15, 2015 01:37 IST

निराधारांना आधार देण्यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजना अंमलात आणली.

लोकमत विशेषनरेश रहिले गोंदियानिराधारांना आधार देण्यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजना अंमलात आणली. परंतु निवडणुकीच्या नादात संजय गांधी निराधार योजनेला मागील १० महिन्यांपासून शासन विसरल्याने गोंदिया जिल्ह्यातील सात हजार प्रकरणे मंजूर झाली नाहीत. मागील १० महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यातील संजय गांधी योजनेचे लाभार्थी आपल्या हक्कासाठी पायपीट करीत आहेत.शासनाने गरिब, गरजू महिला, विधवा, परित्यक्ता, वृध्द व निराधारांसाठी संजय गांधी निराधार योजना अंमलात आणली. तहसील कार्यालयामार्फत या योजनांचा लाभ देण्यात येतो. यासाठी तहसीलदार यांच्यासह एक समिती पालकमंत्री गठित करतात. प्रत्येक तालुकास्तरावर एक समिती असते. त्या समितीने मंजूर केलेल्या प्रकरणातील लाभार्थ्यांना शासनाचा लाभ देण्यात येतो. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पाच महिन्यांपूर्वीच गोंदिया जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत या योजनेसाठी समितीने बैठका घेतल्या नाही. निवडणुकीनंतर जुन्या समित्या रद्द झाल्या. दिवाळीपूर्वी नवीन सरकार आले. परंतु या सरकारनेही संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सहा महिन्यांचा काळ लोटूनही समिती गठित केलीच नाही. पालकमंत्र्याच्या देखरेखीत ही समिती गठित करावी लागते. मात्र गोंदिया जिल्ह्यातील आठ पैकी एकही तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची समिती गठित करण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील सुमारे १० महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यातील सात हजार निराधार संजय गांधी योजनेचा आधार घेण्यासाठी पायपीट करीत आहेत. केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जुन्या योजनांकडे भाजप सरकार दुर्लक्ष तर करीत नाही असे गरिब गरजूंना आता वाटत आहे. तीन महिन्यातून एकदा बैठक घेऊन संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मंजूर करायची असतात. परंतु निवडणुकीच्या पाच महिन्यापूर्वीपासून आतापर्यंत १० महिन्यांच्या काळापासून या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला नाही. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालून समित्या त्वरीत तयार करावे अशी मागणी गरजूंकडून होत आहे. विधवा, परित्यक्ता, अपंग, वृध्द यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृध्दापकाळ योजना व अर्थ सहाय्य योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेणारे बहुतांश लोकांचे कमी प्रमाणात शिक्षण असल्यामुळे त्यांना या योजनेतील कागद पत्रांसाठी बराच वेळ लागतो. त्यातच त्यांचे प्रकरण नामंजूर झाले तर त्यांना निराश व्हावे लागते. अनेक लोक पुन्हा त्या कागदपत्रांची पुर्तता करीत नाही. परिणामी चांगल्या योजनेपासून लोक दुरावतात.कर्मचारी नसल्याने होते गोचीविविध पाच योजनांसाठी तहसील कार्यालयात नेहमीच गर्दी असते. त्या गरजूंना माहिती देण्यासाठी पाच कर्मचाऱ्यांची गरज असते. परंतु पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती राहत नसल्यामुळे लाभार्थ्यांना माहिती मिळत नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे अर्ज सादर केला तर तो अर्ज अपात्र ठरतो. या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.अपात्र प्रकरणात दोष कुणाचा?एखाद्या योजनेच्या माहितीसाठी कोणते कागदपत्र लागते याची संपूर्ण माहिती तहसील कार्यालयातील संबधित लिपीकाकडे असते. परंतु तो लिपीक योग्य मार्गदर्शन करीत नसल्यामुळे अनेक प्रकरणात त्रुट्या असतात. परिणामी ते प्रकरण नामंजूर होते. लाभार्थ्याने दिलेले प्रकरण तपासूनच लिपीक पुढे टाकतो. त्यात त्या अर्जाला अपात्र करण्याचा प्रसंग लिपीकामुळे येतो. पैशांच्या हव्यासापायी लोकांना त्रास देण्याचे काम त्यांच्याकडून होते. त्यासाठी हेतू पुरस्सर अनेक प्रकरणात त्रुट्या ठेवल्या जातात. दलालांमार्फतच मिळतो लाभतहसील कार्यालयामार्फत गरिब, गरजू, अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ दलालामार्फत देण्यात येतो. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊनच दलाल संबंधित लिपीकांशी साठगाठ करून लोकांना भूलथापा देतात. आमच्या शिवाय तुला पैसा मिळणार नाही असेही अनेक लोक त्या लाभार्थ्यांच्या मनावर बिंबवतात. आपल्याला काही न मिळण्यापेक्षा जे मिळेल तेच ठिक समजून अनेक लाभार्थी दलालांच्या माध्यमातून प्रकरण दाखल करतात. शासनाकडून मिळणाऱ्या योजनेच्या पैशातून अर्धी रक्कम त्या दलालांना द्यावी लागत असल्याचे एका पिडीत महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगीतले.