शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांचे वॉक आऊट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:44 IST

गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून केवळ राजकीय हेवेदावे काढण्यात वेळ जातो.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : सर्वसाधारण सभेत प्रशासन झाले मुजोर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या आठ महिन्यांपासून शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून केवळ राजकीय हेवेदावे काढण्यात वेळ जातो. मूळ समस्येला बगल देण्याचे काम होत असून नवीन एलईडी लाईटच्या निविदा प्रक्रियेवरून ऐनवेळी सत्ताधाºयांनी भूमिका बदलल्याचा ठपका शुक्रवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारणसभेतून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी वॉक आऊट केले.सुरूवातीला ठरल्याप्रमाणे विषय पत्रिकेवरील मुद्दे सोडून सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या नगराध्यक्षांमध्ये केवळ उणी-दूणी काढण्यातच दीड तास गेले. नंतर काही सदस्य व खुद्द नगराध्यक्षांनी आक्षेप घेत जुने जाऊ द्या, शहर विकासाकरिता एकत्र येऊन निर्णय घ्या, असे आवाहन केले. यावर भाजपाचे गटनेते विजय खडसे, प्रवीण प्रजापती, दिनेश चिंडाले यांनी आम्ही तीच भूमिका मांडतोय, असे सांगितले. काँग्रेस सदस्यांनी सत्ताधाºयांमध्ये एक वाक्यता नसल्याने याचा लाभ प्रशासकीय यंत्रणा घेत असून कुणावरच कुणाचा अंकुश नसल्याचा आरोप केला.सणासुदीच्या काळात शहरातील स्वच्छतेचे नियोजन नसल्याची खंत खुद्द आरोग्य सभापती नितीन गिरी यांनी व्यक्त केली. सदस्य, पदाधिकारी अगतिक झाल्यासारखे स्वच्छतेच्या मुद्यावर भूमिका मांडत होते. नंतर सभेच्या विषय पत्रिकेवरील चर्चेला सुरूवात झाली. यात एलईडी लाईट बीओटी तत्वावर बसविण्याच्या ई-निविदेवर स्वतंत्र चर्चा होईल, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र नंतर लगेच हा विषय चर्चेचा घेऊन वाटाघाटी सुरू झाल्या. यात काँंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सत्ताधाºयांचे हितसंबध असल्याचा आरोप करून सभेतून वॉक आऊट केले.पालिकेला केवळ १८ टक्केएलईडी लाईट बसविणाºया कंपनीशी वाटाघाटी करून वाचलेल्या रकमेपैकी कंत्राटदार कंपनीला ८२ टक्के, तर नगरपरिषदेला १८ टक्के देण्याचे निश्चित करून ठराव मंजूर करण्यात आला. या सर्वसाधारण सभेत ३६ ठराव मंजूर झाले. नगराध्यक्ष कांचन चौधरी, उपाध्यक्ष सुभाष राय यांच्यासह विषय समिती सभापती व सदस्य सभेला उपस्थित होते.